14 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणासह चौघांना अटक:आरोपीत मुलाची आई, बहिण व मेव्हणीचा समावेश, कोपरगावातील घटना

2 hours ago 1
अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणाऱ्यास तरुणासह गुन्ह्यात आरोपीस मदत करणारी त्याची आई, बहीण व मेव्हुणा यांनाही कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपीला त्याच्या आई व बहिण व मेव्हण्याने मदत केली होती. दरम्यान, या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली होती. कोपरगाव शहरातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस २१ ऑक्टोबर रोजी घराजवळून अज्ञात इसमाने पळवून नेले होते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके करीत होते. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी मुलगी पोलिसांना सापडली. तिच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८७, ६४ (२) (आय), (एम), ६५ (१), ४६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२, १७ प्रमाणे वाढ केली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैभव संजय लोखंडे (वय २०, रा. खडकी, ता. कोपरगाव) याने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेले. यासाठी त्याला त्याची आई मंगल संजय लोखंडे, मेव्हुणा नितीन कैलास समींदर, बहीण अर्चना समींदर (रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी मदत केली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्यास मदत करणाऱ्या नातेवाईकांना अटक केली. चारही आरोपींना कोपरगावच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. मुलीचा शोध व आरोपींना अटक करण्याची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सपोनि आशिष शेळके, सपोनि किशोर पवार, पोसई भुषण हंडोरे, पवार, पोहेकॉ दीपक रोकडे, पोकॉ धोंगडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके हे करीत आहेत. दरम्यान, कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article