ठाण्यातील मूस रोडवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा Pudhari News Network
Published on
:
17 Nov 2024, 5:16 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:16 am
ठाणे : महाराष्ट्र लुटून गुजरातला नेणार्या महाराष्ट्रद्रोही भाजपाला पाठिंबा देणार्या मनसेला एकही जागा सोडली नाही, सोडणार नाही. यापूर्वी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार्या मनसेने आता इन शर्त पाठिंबा दिला आहे. मनसे नव्हे गुनसे अर्थात गुजरात नवनिर्माण सेना बनली असल्याचा घणाघात करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी खोक्यांचे केंद्रबिंदू असलेल्या ठाण्याला लागलेल्या गद्दारीचा कलंक दूर करण्याचे आवाहन ठाणेकरांना केले.
ठाणे विधानसभेचे उमेदवार राजन विचारे, कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ओवळा माजिवडा मतदार संघाचे उमेदवार नरेश मणेरा आणि मुंब्रा कळवा मतदार संघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी शनिवार (दि.16) रोजी ठाण्यातील मूस रोडवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आसूड ओढत त्यांना धडा शिकविण्याचे आवाहन ठाणेकरांना करीत गद्दार मुक्त, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याची साद घातली.
ठाणे हे खोक्याचे केंद्र असून गद्दारांच्या मुळाशी मशाल लवून महाराष्ट्र मुक्त गद्दार करा, असे सांगत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नामर्द असल्याची बोचरी टीका केली. निष्ठावान राजन विचारे यांना थोडा जोर ठाणेकरांनी लावला असता तर गद्दार जिंकला नसता अशी खंत व्यक्त करीत आता संधी आहे. याची ठाणेकरांना आठवण करून दिली.