Published on
:
17 Nov 2024, 5:15 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:15 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - चित्रपट 'कांतारा'चे प्रोडक्शन हाऊस होम्बले फिल्म्सने आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. प्रोडक्शन हाऊसने नव्या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली असून नव्या चित्रपटाचे नाव 'महावतार नरसिम्हा' आहे. हा एक ॲनिमेशन चित्रपट असणार आहे. त्याचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे.
होम्बले फिल्म्सने ग्रामीण भारताच्या कहाणीवर आधारित सुपरहिट चित्रपट कांतारा आणला होता. एक अशी कहाणी जी सर्वांच्या पसंतीस उतरली. या प्रोडक्शन हाऊसने आपल्या पुढील प्रोजेक्टसाठी काम सुरु केले आहे. ते कोणत्या कहाणी वा मायथोलॉजीवर काम करत आहेत.
भगवान विष्णू यांच्या अवतारावर येणार चित्रपट
निर्मात्यांनी नव्या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या नव्या चित्रपटाचे नाव 'महावतार नरसिम्हा' आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर जारी केलं आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जेव्हा आस्थाला आव्हान दिले जाते, तेव्हा ते प्रकट होतात. अंधार आणि अराजकताशी त्रस्त जगामध्ये किंवदंती, अर्ध-मानव, अर्ध-सिंह अवतार-भगवान विष्णूचा सर्वात शक्तीशाली अवतार प्रकट होण्याचे साक्षीदार बनले. चांगले आणि वाईट यांच्यामधील महाकाव्य युद्धाचे 3D मध्ये अनुभव करा. लवकरच चित्रपटगृहात येत आहे. #MahavatarNarsimha #Mahavatar सीरीजची पहिली कहाणी आहे.'
घोषणेबद्दल बोलताना निर्माता विजय किरागंदूर यांनी म्हटले, 'महावतार नरसिंहचा हिस्सा बनून आम्हाल खूप अभिमान आहे. या ॲनिमेटेड चित्रपटाला खूप मनाने, आस्था आणि मूल्यांसोबत बनवलं आहे. ज्यांच्यावर आपण दृढतेने विश्वास करतो. आम्हाला वाटते की, ही एक महत्वपूर्ण कहाणी आहे, जी शेअर करायला हवी. आम्ही भगवान विष्णूचे चौथे अवतार भगवान नरसिंहची कहाणीला ॲनिमेशनच्या माध्यमातून आणण्यासाठी सन्मानित आहे. या त्या कहाण्या आहेत, जे भारताचे प्रतिनिधीत्व करतात. आणि आमचे म्हणणे आहे की, प्रत्येकाला याच्याशी जोडण्याची संधी मिळायला हवी.'
होम्बले फिल्म्स दमदार कथांसाठी ओळखले जाते. त्यांच्या आतापर्यंतच्या शानदार चित्रपटांमध्ये हिट 'कांतारा', 'केजीएफ १', 'केजीएफ २' आणि 'सालार: पार्ट १ - सीजफायर' चा समावेश आहे.