'डीआरडीओ'ची लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिकची ऐतिहासिक उड्डाण चाचणी यशस्वीPudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 3:40 am
Updated on
:
17 Nov 2024, 3:40 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : डीआरडीओने रविवारी (दि.17) ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. यावर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'एक्स'वर पोस्ट करून डीआरडीओच्या टीमचे कौतुक केले. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलाच्या सर्व सेवांसाठी 1500 किमीपेक्षा जास्त श्रेणीसाठी विविध पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे.हा सर्वांसाठी
#WATCH | DRDO successfully conducted a flight trial of its long-range hypersonic missile on November 16, 2024, from Dr APJ Abdul Kalam Island, off the coast of Odisha.
This hypersonic missile is designed to carry various payloads for ranges greater than 1500km for all the… pic.twitter.com/E7drLjbW8J
— ANI (@ANI) November 17, 2024यावेळी ते म्हणाले "ओडिशाच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी यशस्वी केली. या चाचणीमुळे भारताने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा सर्वांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीने आपला देशाचा निवडक गटात समावेश झाला आहे. प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या राष्ट्राचे, सशस्त्र दलांचे आणि उद्योगाचे अभिनंदन करतो " त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. दरम्यान, आरएमओ इंडियाच्या अधिकृत हँडलने मिशनची एक क्लिप पोस्ट केली जिथे फ्लाइट चाचणी पाहिली जाऊ शकते.