विलासराव देशमुखांना जय भीम म्हटल्याने माझी मंत्रीपदाची संधी हुकली:नितीन राऊतांचा व्हिडिओ चित्रा वाघांनी केला पोस्ट

2 hours ago 1
काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या एका व्हिडिओची सध्या चर्चा रंगली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्री केलं नाही, असं नितीन राऊत बोलताना दिसत आहे. भाज नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये जय भीम म्हटले म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्री केले नाही, असे नितीन राऊत म्हणताना दिसत आहेत. आता या व्हिडिओमुळे राजकारण तापणार असे चित्र दिसून येत आहे. दरम्यान राहुल गांधी अमेरिकेत बोलताना म्हणाले होते की, जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असे राहुल गांधी एका कार्यक्रमात म्हणाले होते, यावरुन सत्ताधारीपक्षाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. नेमके चित्रा वाघ यांचे ट्विट काय? चित्रा वाघ ट्विटमध्ये म्हटलंय की, काँग्रेसची संस्कृती नेहमीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी..! ऐका, एका भाषणामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत सांगतात, की केवळ 'जय भीम' म्हटले म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. अहो, नितीनजी यात नवीन काय आहे ? प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसवाल्यांनी दोनदा निवडणुकीमध्ये पाडले, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? यांचा मूळ चेहरा आरक्षणविरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी आणि फक्त मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आहे, त्यांच्याकडून तुम्हालाच काय भारतात कोणालाच न्याय मिळणार नाही! पूर्वीपासून हीच आहे काँग्रेसची संस्कृती…! उत्तर नागपूरचे उमेदवार काँग्रेस नेते आणि विद्यमान आमदार नितीन राऊत उत्तर नागपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. नितीन राऊतांच्या विरोधात भाजपने मिलिंद माने यांना तिकीट दिले आहे. नितीन राऊत यांनी 2019 मध्ये भाजपच्या डॉ. मिलिंद मानेंना पराभूत केले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article