मतदानाची गोपनियता भंग; टपाली मतदान व्हायरलfile photo
Published on
:
17 Nov 2024, 7:17 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:17 am
वृत्तसेवा शिक्षण, नोकरीनिमित्त स्थलातंरित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकांकडून मूळ गावी आणि राहत्या ठिकाणी अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणी केली जाते. त्यामुळे काही ठिकाणी मतदार यादी लांबलचक असूनही मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लोकसभा निवडणूक तसेच मागच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी राहिली आहे. याबाबत निवडणूक आयोगाच्या वतीने नाराजीही व्यक्त करण्यात आली आले. मतदानाची टक्केवारी घटण्यामागे इतर कारणांबरोबर मतदारांची दुबार नोंदणी हे एक महत्त्वाचे कारण आहे.
लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम १७ आणि १८च्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान नोंदणी करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीने नवीन ठिकाणी मत नोंदणी करताना दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीत नाव नाही, हे जाहीर करणे बंधनकारक असते. जर याबद्दल खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम ३१ नुसार शिक्षा होऊ शकते.
राज्यभरात मतदार याद्यांच्या शुद्धीकरणात अजूनही त्रुटी शिल्लक आहेत. अनेक मतदारांची नावे दोन किंवा अधिक ठिकाणीच्या मतदार यादीत आढळून येतात. मतदार यादीतील नावे आधार क्रमांकाशी जोडल्यास यातील अनेक दुबार नावे वगळली जाऊ शकतात. मात्र, प्रशासनात संभ्रम आहे. मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी राज्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी उपक्रम राबविले आहेत. राज्यात या उपक्रमांमधून लाखोंच्या संख्येने दुबार नावे वगळण्यात आलीही आहेत, तरीदेखील अनेक मतदार दोन ठिकाणी मतदान करत असल्याच्या घटना घडत असतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावाला आधार क्रमांक जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, आधार जोडणी हे बंधनकारक नसल्याने मतदार याविषयी अनुत्सुक असतात. आधार क्रमांक जोडल्यास ही दुबार नावे वगळणे सोपे होईल. त्यामुळे मतदार याद्यांचे शुद्धीकरण होऊन त्या अधिक पारदर्शक होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आधार जोडणीचे काम ऐच्छिक असल्याने मतदार याद्यांचे शुद्धीकरण अद्याप झाले नाही. त्यामुळे अनेक मतदार दोन ठिकाणी असल्याचे आढळून येते. तसेच, त्यांना दोन मतदार ओळखपत्रदेखील सहज मिळालेली आहेत. कायद्यानुसार दोन मतदार ओळखपत्र असणे गुन्हा आहे. त्याचा वापर करणेही गुन्हा ठरत आहे. मात्र, त्यावर नेमकी काय कारवाई करावी, याविषयी प्रशासनात संभ्रम आहे. मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी राज्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी उपक्रम राबविले आहेत. राज्यात या उपक्रमांमधून लाखोंच्या संख्येने दुबार नावे वगळण्यात आलीही आहेत, तरीदेखील अनेक मतदार दोन ठिकाणी मतदान करत असल्याच्या घटना घडत असतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावाला आधार क्रमांक जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, आधार जोडणी हे बंधनकारक नसल्याने मतदार याविषयी अनुत्सुक असतात. आधार क्रमांक जोडल्यास ही दुबार नावे वगळणे सोपे होईल. त्यामुळे मतदार याद्यांचे शुद्धीकरण होऊन त्या अधिक पारदर्शक होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.