मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी राबवला उपक्रम:औद्योगिक वसाहतीमध्ये ‎मतदानाविषयी जनजागृती‎

2 hours ago 1
बोदवड विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रशासनातर्फे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यात ८ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत विविध ठिकाणी मतदान जागृती करण्याचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये १५ नोव्हेंबर रोजी औद्योगिक क्षेत्रातील वोटर अवरनेस फोरमच्या माध्यमातून कामगारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीचा उपक्रम घेण्यात आला. त्यासाठी बोदवड पंचायत समितीच्या वतीने बोदवड शहरातील अमर डेअरीमध्ये कामगारांना मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मतदारांना अधिकाऱ्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रत्येक मतदारांनी कामाची वेळ सांभाळून मतदान करण्यासाठी अवश्य वेळ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास गटविकास अधिकारी आर. बी. सपकाळे, गटशिक्षणाधिकारी बी. एन. लहासे, कृषी विस्तार अधिकारी एस. जे. भारती व ग्रामसेवक तसेच पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीमध्ये मतदानाविषयी जनजागृती कामगारांना मतदानाबाबत जागृती करताना प्रशासकीय अधिकारी.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article