इसापूर धरणातून रब्बीत तीन तर उन्हाळी हंगामासाठी सात पाळ्या पाणी:1.10 लाख हेक्टरला मिळणार लाभ, 1 डिसेंबरपासून पहिले आवर्तन

2 hours ago 1
हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्हयासाठी महत्वपूर्ण असलेल्या इसापूर धरणातून रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी हंगामासाठी चार अशा एकूण सात पाणी पाळया देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे १.१० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना सिंचनासाठी फायदा होणार आहे. हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यासाठी इसापूर धरण महत्वपूर्ण आहे. इसापूर धरणावर कळमनुरी शहरासह २३ गाव मोरवड पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. या शिवाय इतर लहान मोठ्या पाणी योजना देखील या धरणावर अवलंबून आहेत. इसापूर धरणामध्ये सध्याच्या स्थितीत ९६४ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा साठा आहे. धरण शंभर टक्के भरल्यामुळे सिंचना सोबतच पिण्याचा पाण्याचा प्रश्‍नही मार्गी लागला आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा लक्षात घेता रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी हंगामासाठी चार अशा एकूण सात पाणी पाळ्या देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले. १.१० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना सिंचनासाठी फायदा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article