मंत्री नितेश राणे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. File Photo
Published on
:
08 Feb 2025, 7:57 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:57 am
सिंधुदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर दिल्लीकरांनी ठेवलेला विश्वासाचा विजय आहे. काल दिल्लीत तीन माकडं बसून ईव्हीएम वर बोलत होती, ही माकड आज आहेत कुठे? असा सवाल करताना कालच्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेवर राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली. (Delhi Assembly Results)
27 वर्षानंतर दिल्लीच्या जनतेने जो विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर दाखवलेला विश्वास आहे. या निकालावरून राहुल गांधीची लायकी समजली, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिल्लीच्या निकालावर दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही जागा वक्फ बोर्डला दिली जाणार नाही. पालकमंत्री म्हणून मी नक्कीच काळजी घेईन. प्रशासनाला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला भरघोस असा निधी दिला जाईल. याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल.
सर्वात मोठा बंगाली बुवा मातोश्रीवर बसतो
सर्वात मोठा बंगाली बुवा मातोश्रीवर बसतो. उद्धव ठाकरेंच्या काळ्या जादूच्या घटना महाराष्ट्राला सांगितल्या, तर लोक त्याला घरात पण घेणार नाही. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी वर्षाच्या मागच्या बाजूला लोन मध्ये काय काय पुरून ठेवले आहे, याची माहिती महाराष्ट्राला आता द्यावी लागेल. त्यामुळे संजय राऊतने त्याच्या मालकाचे अजून वस्त्र वस्त्रहरण करू नये.
जिल्ह्याची बदनामी होऊ देणार नाही
पर्यटकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मी स्वतः या संदर्भात माहिती घेतलेली आहे. फूड अँड सप्लाय खात्याशी मी आता बोललेलो आहे. मालकाने परवानगी घेतली आणि दुसऱ्याला चालवायला दिलेला आहे. फलक कोणत्या दुसऱ्याच नावाने लावलेला आहे. अशा हेराफेरी करणाऱ्या लोकांची हॉटेल्स आपल्या जिल्ह्यात असू नयेत. या एका घटनेमुळे जिल्ह्याची बदनामी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.