उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा:ठाकरे गटाच्या नितीन देशमुख यांची महाविकास आघाडीकडे मागणी

2 hours ago 2
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तसेच महायुती व महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्री कोण होणार यावर देखील दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महाविकास आघाडीमधून कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मुख्यमंत्री पदावरून कुरघोड्या सुरू आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. नितीन देशमुख म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण चोरणारे भाजप आणि शिंदे हे रावण आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही महाराष्ट्रातील प्रत्येकाची इच्छा आहे. महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावे, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे. शिवसेनेसोबत असल्यानेच कॉंग्रेस एका खासदारांवरून 13 खासदारांवर गेली आणि भाजप 23 खासदारांवरून 9 खासदारांवर आली असल्याचेही नितीन देशमुख यावेळी म्हणाले. नितीन देशमुखांचा शिंदे गटाला इशारा नितीन देशमुख म्हणाले, शिंदे गटाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले नाही तर राजकारणात राहणार नाही. शिंदेंचा आमदार बुरखे वाटतो तेव्हा हिंदुत्व सोडले असे का म्हणत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेला हरवण्यासाठी भाजप वंचितला मदत करत आहे. मला हरवण्यासाठी रणनीती नव्हे तर कट रचण्यात येणार असल्याचेही नितीन देशमुख यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आरक्षणाच्या मुद्याने पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस देखील झाला आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण सुरू केले आहे. एकीकडे असे वातावरण असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये देखील अंतर्गत मतभेद असल्याचे समोर येत आहे. त्यातच आता महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीने देखील रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार याची उत्सुकता आतापासूनच सर्वांना लागली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article