उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPudhari File Photo
Published on
:
23 Sep 2024, 2:30 pm
Updated on
:
23 Sep 2024, 2:30 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली. पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर तीन राऊंड फायर केले.