Published on
:
08 Feb 2025, 7:06 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:06 am
पोलादपूर | समीर बुटाला
जय भवानी,जय शिवाजी,जय संभाजी,जय तानाजी अशा जयघोषांनी उमरठची ऐतिहासिक भूमी दणाणून गेली. हातात भगवे ध्वज घेऊन रणरणत्या उन्हात उमरठ ते किल्ले रायगड असा पायी प्रवास करत धारातीर्थ यात्रेसाठी सहभागी झालेले हजारो शिवभक्त अशा जोषपूर्ण वातावरणात गुरुवारी उमरठ येथे या मोहिमेला प्रारंभ झाला.
संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ते 11 फेब्रुवारीपर्यत उमरठ ते किल्ले रायगड किंजळोली येथील मुरारबाजी देशपांडे यांच्या गावापर्यंत गडटोक मोहिमेसाठी हजारो धारकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ही मोहीम गेली अनेक वर्षे सुरू आहे. सुमारे 50 हजाराच्या आसपास धारकरी या मोहिमेत सामील होत असतात. त्याच धर्तीवर पोलापूरच्या ऐतिहासिक उमरठ येथे धारकर्यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने सर्व सोयी सज्ज ठेवलेली आहे. उमरठ येथे चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच इंद्रजीत कळंबे व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी प्रशासनाने दिलेल्या पाणी व्यवस्था चोखपणे धारकर्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायत उमरठ तर्फे करण्यात आले आहे. या मोहिमेची सुरुवात शनिवारी उमरठ वरून किल्ले रायगड कडे होईल यादरम्यान व्याख्यान होतील व गड संवर्धनाचा संदेश अखंड हिंदुस्तान पर्यंत दिला जाईल.
संभाजी भिडे गुरुजींचे स्वागत
मोहिमेसाठी संभाजी भिडे गुरुजी चे आगमन झाले असता वाकण ग्रामपंचायत मध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी त्रिशिला गंभीरे ,ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते. उमरठ पर्यत जाणार्या मार्गावर स्वागत करण्यात येत होते. उमरठ गावात सुद्धा मोठ्या जल्लोषात स्वागत करत महिलावर्गाने संभाजी भिंडे गुरुजींना आरती ओवाळून औक्षण केले.
हजारो धारकरी उमरठ कडे कूच करीत होते . त्याच्या साठी सर्व सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध केल्या होत्या. राज्यातील तसेच बेळगावमधील हजारी धारकरी दाखल झालेले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत होते. त्याच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मोठा पोलीस बंदोबस्त व शिस्तीत मार्गक्रमण दसून येत होते.
हिंदवी स्वराज्याचे व्रत आजन्म आचारण करण्याची शपथेसह गडाचे महत्व लक्षात घेता छत्रपतींचा ज्वलंत इतिहासचाही साक्ष ठेवत गडा ची देखभाल प्रत्येक कामेकरणे गरजेचे आहे असे आवाहन या मोहिमे द्वारे करण्यात आले