Published on
:
25 Jan 2025, 12:33 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:33 am
कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथे ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत कुंडल पोलिसांत संशयित हरी बबन सानप (वय 35, रा. कासेवाडी, ता. आष्टी, जिल्हा बीड) याला ताब्यात घेतले आहे.
दि. 21 रोजी सकाळी आई-वडील ऊस तोडणीसाठी गेले होते आणि ही मुलगी खोपटामध्ये एकटीच होती. यावेळी हरी सानप हा खोपटात गेला आणि खेळत असलेल्या या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केले. या सर्व प्रकाराची त्याने मोबाईलवर चित्रफीत तयार केली. पीडित मुलीने आरडाओरडा केला; पण मदतीला कोणी आले नाही. दुसर्या दिवशी संशयिताने त्याचा मोबाईल दुसर्याला विकला. त्या व्यक्तीने मोबाईलमधील तयार केलेली चित्रफीत पाहिली. ती त्याने पीडित मुलीच्या वडिलांना दाखवली, तेव्हा या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. यावरून दि. 22 जानेवारी रोजी बीडला पळून गेलेल्या संशयिताला जाब विचारायला पीडितेचे वडील गेले होते. दि. 23 रोजी रात्री उशिरा कुंडल पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार कुंडल पोलिसांनी बीड येथून संशयिताला अटक केली. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील तपास करत आहेत.