>> दिलीप रावडे
सृष्टीचा नियम आहे की, जो जो शक्तिशाली आहे त्याच्या त्याच्या हातात ताकद आहे तो तो दुर्बलांवर सत्ता गाजवतो आणि वेळ पडली तर त्यांच्या संहाराचेही कारण बनतो. ज्याने हे तंत्रज्ञानच निर्माण केलेलं आहे त्यानं या तंत्रज्ञानाकडे जर आपले सर्वस्वच अर्पण केलं तर आज तो फक्त तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले करणारा ठरेल. भविष्यात एक रोबोटिक युद्ध आपल्याला टाळता येणार नाही आणि म्हणूनच तेव्हा या समस्त जीवसृष्टीच्या संहाराचं कारण हीच मानवी बुद्धिमत्ता असेल. जाता जाता फक्त एकच सांगू इच्छितो की, ऊस गोड लागला म्हणून तो मुळापासूनच नाही तर तो माती सकट खायचा जो आपला दृष्टिकोन आहे, तो बदलायला हवा.
80 आहे. शालेय जीवनात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. त्यामुळे काही विद्यार्थी उत्तम रीतीने त्याचा वापर करतात तर काही विद्यार्थी त्याचा उपयोग करीत नाहीत. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त एक सुसज्ज रोबोटिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्याचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आठवड्यातून दोन तास विद्यार्थी रोबो बनविण्याचे प्रशिक्षण घेत असतात. प्रयोगशाळेत रोबोटिक्स या विषयामध्ये विद्यार्थ्यांना सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे प्रायोगिक ज्ञान अवगत होते. यामध्ये बोट कंस्ट्रक्शन त्याचे प्रोग्रॅमिंग आणि नंतर मॅटवर इम्प्लिटेशन केले जाते. साधारणपणे अभ्यासक्रम तयार करताना भौतिकशास्त्राचे नियम (गती, दिशा आणि बल), मोटारचे विविध प्रकार, सेंसरचे प्रकार उदाहरणार्थ डिफेन्स फोस, कलर हब, कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ, यूएसबी केबलच्या साह्याने गेअरचे प्रकार शिकविले जातात. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप करून त्यामध्ये बोट डिझाईन कोडिंगद्वारे प्रोग्राम करून टास्कचे नियोजन केले जाते. आणि नियोजित वेळेत काही स्पर्धा आयोजित केल्या आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी भाग घेतात. त्यामध्ये रमणबाग प्रशालेला नेहमी प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त होते.
हे सर्व चित्र पाहिल्यानंतर माझ्या मनात प्रश्न येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्यातील आवाहन २१व्या शतकात स्वतंत्रज्ञान प्रगत माणसाकडे आहे. या समृद्ध प्रवासात त्याच्याजवळ असलेली एक अमूल्य देणगी बुद्धिमत्तेच्या जोरावर राखली आहे. मग तो कोणतंही किचकट काम करणे असो किंवा कोणतंही सोप्पं काम करणं असो माणूस आजवर त्याची बुद्धीच वापरत आलाय. परंतु आज मात्र हेच काम माणसासारखा विचार करणारी यंत्र करू शकतील का? असा विचार कुठेतरी होऊ लागलाय आणि याच विचारधारेतून एक विचारप्रणाली निर्माण झालेली आहेत ज्याचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात्त आर्टिफिशियल इन्टेजिलन्स (एआय) ते थेट अंतराळात एक चांद्रयान पोहोचवण्यापर्यंत अशी तंत्रज्ञानाची असंख्य उदाहरणे आपल्यासाठी आहेत.
स्मार्टफोनमध्ये अलेक्सा कॉम्प्युटर, व्हिजन फेशियल, काफिंगसारखे तंत्रज्ञान असो किंवा परदेशातल्या एका वृद्धाश्रमामध्ये या वृद्धांचे एकटेपण घालवणारा तो रोबोट असू देत किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रकर्म करणारा रोबोट या तंत्रज्ञानाच्या असंख्य अंगांनी आज एकविसाव्या शतकाची मंडळी या तंत्रज्ञानाचा शोध घेत असताना माझ्या मनात एक गोष्ट लक्षात येते की कार्यशाळेत संशोधक जॉन कारदे यांनी सर्वप्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा शब्द वापरला आणि तीच खरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधाची आणि संशोधनाची सुरुवात ठरली. आज जगभरातल्या असंख्य देशांसोबत भारतामध्येही हे तंत्रज्ञान अगदी सर्रास वापरण्यात आले आणि म्हणूनच मूळ विषयाच्या अनुषंगाने बोलायला सुरुवात करताना मला भारतासारख्या विकसनशील आव्हानं आपल्यासमोर येतील याचा आढावा घेणं सर्वप्रथम उचित वाटतं. आणि त्यासाठी २०१८ चा निती आयोगाचा अहवाल लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते. निती आयोगाच्या अहवालाप्रमाणे भारताने कृषी, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, दळणवळण आणि स्मार्ट शहरे या काही क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्राधान्याने वापरण्यास सुरुवात केली. यश-अपयशाच्या स्पर्धेमध्ये अजूनही हे तंत्रज्ञान कुठेतरी मला गुरफटलेलं दिसतंय, सुरुवात कृषी क्षेत्रापासूनच करायची झाली तर आजही आपला हा बळीराजा या नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कुठेतरी सुशिक्षित आणि प्रशिक्षित असणं नितांत गरजेचे आहे. आधीच कर्जबाजारी झालेला हा शेतकरी या तंत्रज्ञानापासून आजही खूप कोस दूर आहे हो. आणि म्हणूनच भविष्यात या शेतकरी आणि तंत्रज्ञानाचा समन्वय घडून आणणं हे आपल्यासाठी पहिलं आव्हान असणार आहे. दुसरे उदाहरण मला शिक्षण क्षेत्राचं द्यावंसं वाटतं. पाटी-पेन्सिल आणि पुस्तकांची जागा आज मशीन लर्निंग आणि ई टॅब्लेट्सने घेतलीय. एका हाडाच्या शिक्षकाची जागा आज संगणकांनी आणि मशीन लर्निंगने घेतली. नक्कीच नव्या उपक्रमाद्वारे पण आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती तर करूच, पण खरंच हे शिक्षण संवेदनाक्षम शिल्लक राहील का? कारण शिक्षण म्हणजे काय हो? शिक्षण म्हणजे एक संवेदनक्षम माणूस घडवणं, या हृदयीचे त्या हृदयी होय. कृत्रिम विश्वास संवेदना कुठून आणायच्या? आणि म्हणूनच भविष्यात आपल्यासमोर आव्हान राहील ते म्हणजे या पुढच्या पिढीमध्ये संवेदनाक्षम माणूस बनवून मानुसकी टिकवून राहील. मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं ते वैद्यकीय क्षेत्राचं. पेशानं डॉक्टर असताना माझ्या या क्षेत्रामध्ये आज तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे. अगदी एक्स-रेपासून एमआरआयच्या मशीन ते रोबोटिक सर्जरीपर्यंत या सगळ्या सुविधा आम्ही रुग्णांना पोहोचवतोय याचा मला फार अभिमान वाटतो. पण त्याहीपेक्षा एक खूप मोठी खंत माझ्या मनाला वाटते की, या गरजवंत रुग्णापर्यंत या सगळ्या सुविधा त्या आणीबाणीच्या काळात आम्ही अजूनही पोहोचवू शकलेलो नाही. आणि याचं हल्लीचंच उदाहरण घ्यायचं तर झारखंडमधील मुजावर पोरी येथे झालेल्या जापनीज एंन्सपाईल्स साथीमध्ये अनेक लहान बाळांनी आपले जीव गमावलेले आहेत. एका रुग्णाचा जीव वाचवताना अगदी एक एक सेकंदाचं काय महत्त्व असतं ना ते आपल्या सगळ्ळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या सुविधा त्या प्रत्येक रुग्णाला त्याला परवडणाऱ्या दरात आणि त्या वेळेत पोहोचवणं हे आपल्यासाठी अजून एक मोठं आव्हान असणार आहे.
आपल्या देशामध्ये शास्त्र संमत संशोधनांचा अभाव आहे. हे सर्व तंत्रज्ञ तंत्रज्ञान निर्माण करतात. त्याला आपल्याच देशात टिकवून ठेवण्यासाठी आपल्याच देशामध्ये त्याला संधी मिळवून देणं हे आज एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आणि यासाठी त्यांना पुरेसा अर्थनिधी मंजूर करून देणे हे नितांत गरजेचे आहे. ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आधीच मंदीचे सावट आहे तिथे अजून एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे बेरोजगारी असेल. अर्थातच जेव्हा मशीन लर्निंग आणि रोबोटसारखं तंत्रज्ञान माणसाची जागा घेतील तेव्हा सृजनशील कामांना नक्कीच वाहून येईल का? पण ज्यांच्या कामात रिपिटेटिव्ह, पण आहे अर्थात तोच तोचपणा आहे त्यांना मात्र भविष्यात कमी संधी प्राप्त होतील. परंतु मंडळी आज मला एक स्वतःचं वैयक्तिक मत या लेखात मांडावंसं वाटतं की भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेमधली पहिली ओळ म्हणते आम्ही भारताचे नागरिक. भारताचे एक सर्व बहुमत तंत्रज्ञान खरंच आज याचा विचार करतेय का हो आणि ते जर करत असतील तर आज नालीमध्ये उतरून मलमूत्र साफ करणारा माणूस अजूनही शिल्लक राहिला नसता. कारण ही माणसं या अत्यंत गंभीर समस्येमुळे आपला जीव गमावत आहेत. सप्टेंबर २०१८ मध्ये डेटा आहे की भारतात दर पाच दिवसाला एक माणूस आपला जीव गमावतोय आणि या समस्येकडे आपण डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे. त्यांच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे.
(लेखक निवृत्त मुख्याध्यापक आहेत)