एकनाथ शिंदेंना भेटायला जाणार यात तथ्य नाही:मुख्यमंत्री परतल्यावर पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

2 hours ago 1
राज्यात पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात काही मंत्री पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे समोर आले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला होता, मात्र तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवारच्या अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. यामुळे शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रायगड तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच आता त्यांची भेट घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जाणार असल्याची चर्चा होती. पण आपण भेटायला जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी एकनाथ शिंदेंची भेट घ्यायला जाणार यात तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतल्यावर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मार्ग काढू. मुख्यमंत्री आऊट ऑफ इंडिया आहेत. त्यामुळं निर्णय होऊ शकला नाही, मात्र ते आले की निर्णय यावर होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री सध्या आऊट ऑफ इंडिया आहेत. त्यामुळे निर्णय होऊ शकला नाही. मात्र ते आले की यावर निर्णय होईल. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय स्थगित करण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आले होते, तर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. चंद्रशेखर बावनकुळे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, आंदोलनात्मक पवित्रा कोणी घेऊ नये. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चर्चा म्हणजे दबाव नाही. चर्चा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. 25 तारखेला मुंबईत मोर्चा निघणार असून यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फडणवीस सरकार जेव्हा जेव्हा आले तेव्हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे बावनकुळे यांनी म्हंटले आहे. दरम्यान, रायगड येथे शिवसेन शिंदे गटाने दावा केला असून भरत गोगावले यांना पालकमंत्री पद हवे आहे, मात्र येथे सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. तसेच नाशिक येथे देखील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्री पदावर दावा केला होता. तिथे गिरीश महाजन यांची निवडण करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article