लखनऊहून मुंबई सीएसएमटीला येणाऱ्या ट्रेन क्र.१२५३३ एक्सप्रेसला जळगावातील पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ५.४७ वाजता भीषण अपघात घडला आहे. पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून घर्षणाने धुर आल्याने आगीची अफवा पसरुन पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी रुळांवर उतरले तेवढ्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने उडविल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू तर १६ ते १७ जण जखमी झाले आहेत. ही आगीची अफवा कशी पसरली याविषयी विविध दावे केले जात आहेत. या ट्रेनने अचानक ब्रेक दाबल्याने चाकांतून धुर आल्याने प्रवाशांनी घाबरुन सुरक्षा साखळी खेचल्याचे म्हटले जात आहे. तर काहींनी गाडी चेन खेचल्याने अचानक थांबल्याने चाकांतून धुर आल्याचे म्हटले जात आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेस थांबवल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस बोगीतून उतरले. याच दरम्यान दुसऱ्या बाजूने भरधाव वेगाने आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडविल्याचे म्हटले जात आहे. या कर्नाटक एक्सप्रेसचा वेग प्रचंड होता. गाडी नेमकी पुलावर थांबल्याने या प्रवाशांना पटकन उडी न मारता आल्याने देखील मृतांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी वळण असल्याने भरधाव वेगाने येणारी कर्नाटक एक्सप्रेस प्रवाशांना दिसली नसल्याची माहिती सूत्रांनी म्हटली आहे.
घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. दोन्ही ट्रेनला थांबविण्यात आल्या आहेत. त्यानंतर एटीआर ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. या घटनेत ११ जण ठार झाले आहेत तर १६ ते १७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहीतीनुसार पुष्पक एक्सप्रेसला थांबविल्यानंतर लोक आगीच्या अफवेने प्रवासी खाली उतरले. हे प्रवासी समोरुन विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली चिरडले गेले. पुष्पक एक्सप्रेसमधून डाव्या बाजूला प्रवासी उतरले. ३० जणांना कर्नाटक एक्सप्रेसने उडविल्याचे म्हटले जात आहे.
थर्ड एसीमध्ये आगीची अफवा पसरली…
व्हायरल व्हिडीओत पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांखाली आलेल्या प्रवाशांचे मृतदेह थर्ड एसीच्या डब्यांजवळ पडलेले दिसत आहे. त्यामुळे आगीची अफवा ही थर्ड एसीमध्येच पसरली असावी असे म्हटले जात आहे. जेथे हा अपघात घडला तेथून एक पुलाचा बंधारा दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांनी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे एकीकडे कर्नाटक एक्सप्रेस तर दुसरीकडे पुलाचा कठडा अशा कोंडीत प्रवासी सापडले. घटनेनंतर भुसावळ डीव्हीजनचे डीआरएम घटनास्थळी पोहचले.पंचनाम्यानंतर मृतदेहांना स्थानिक रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क साधण्यात येत आहे.
घातपाताच्या अँगलनेही तपास होणार
या अपघात प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात काही घातपाताचा अँगल तर नाही ना याचा देखील तपास केला जाणार आहे. जळगाव येथे महाकुंभला जाणाऱ्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना नुकतीच झाली होती. त्यामुळे सर्व बाजूने या घटनेचा तपास केला जात आहे. या अपघाताची प्रत्येक अँगलने चौकशी केली जाईल असेही भुसावळचे डीआरएम यांनी म्हटले म्हटले आहे.