एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात संविधान उद्देशिका वाचन कार्यक्रम:संविधान दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले

15 hours ago 1
दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोलाद्वारे संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी युनिट तसेच एनएसएस युनिटतर्फे २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वितरण व वाचन कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर व एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. नागनाथ गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांनी उपस्थित एनसीसी. कॅडेट्सला व विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिका वितरित करून त्याचे वाचन केले. त्यांनी संविधान दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी. जी. गोंडाणे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले. तसेच २६/११ या दिवसाला मुंबई येथील ताज व ओबेरॉय हॉटेलवर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रस्तावना डॉ. मोनिका साबू यांनी केले. या कार्यक्रमाला दी बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष अभिजित परांजपे, मानद सचिव डॉ. पवन माहेश्वरी, सहायक सचिव विक्रम गोलेच्छा यांचे सहकार्य लाभले. संविधान उद्देशिका वाचन या कार्यक्रमाला वरिष्ठ तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व एनसीसी कॅडेट्स व एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article