बऱ्याचदा इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन मागवतो, पण त्याच वस्तू जीवघेण्या ठरल्या तर, अशीच एक घटना घडली आहे कर्नाटकमध्ये. एका ऑनलाइन पार्सलमध्ये आलेल्या हेअर ड्रायरमुळे चक्क महिलेल आपले दोन्ही हात गमवावे लागले.
कर्नाटकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. ज्यांच्यासोबत ही घटना घडली त्यांचे नाव आहे बसवराजेश्वरी. त्याचं झालं असं शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचे पार्सल आले तेव्हा ती घरात नसल्याने तिने बसवराजेश्वरीला फोन केला आणि तिचं पार्सल घेण्याची विनंती केली. बसवराजेश्वरी य़ांनी पार्सल घेतलं.
शशिकला यांनी पार्सलमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी त्यांना पार्सल उघडण्यास सांगितलं, तेव्हा बसवराजेश्वरी यांनी ते उघडलं आणि त्यात हेअर ड्रायर होतं. बसवराजेश्वरी यांनी ते हेअर ड्रायर पॉवर सॉकेटमध्ये लावलं आणि ते सुरु करताच त्या हेअर ड्रायरचा स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज ऐकून काही शेजारी धावत आले आणि त्यांनी पाहिले की बसवराजेश्वरीच्या हाताचे तळवे आणि बोटं कापली पूर्णत: जखमी झाली होती. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे त्यांच्या दोन्ही हाताचे तळवे कापावे लागले. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार 15 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मात्र याबाबत बसवराजेश्वरी यांच्या मैत्रिणीला विचारलं असता त्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी कोणतंही हेअर ड्रायर ऑनलाइन ऑर्डर केलं नव्हतं.
दरम्यान याबाबत या प्रकरणाबाबत इलकल पोलिस ठाण्यात गु्न्ह्याची नोंद करण्यात आली. तसेच तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे म्हटलं आहे. हेअर ड्रायर सारखी उपकरणं वापरण्यासाठी 2-वॅटचे विद्युत कनेक्शन आवश्यक आहे. मात्र वीज त्यापेक्षा जास्त असल्याने ही दुर्घटना झाली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पण बसवराजेश्वरीचे मेहुणे शिवनगौडा यरनल यांनी दिलेल्या माहितीनुसार , शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणिच्याच नावाने हे कुरिअर पार्सल बुक करण्यात आलं होतं. ते पार्सल बसवराजेश्वरीला देण्यास सांगितलं होतं. त्यामुळे नक्की हे काय प्रकरण आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच हे उपकरण कोणी मागवलं होतं आणि ते कुठून पाठवलं होतं याचाही पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान बसवराजेश्वरी या एका जवानाच्या पत्नी आहे. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे बसवराजेश्वरी यांचे पती पपण्णा यरनल यांचा मृत्यू झाला.