कक्कय्या समाजातील पहिल्या वैमानिक मुलीची गगनभरारी:खर्डा येथील कॅप्टन नीलम इंगळे-लोबो गेल्या २२ वर्षांपासून चालवतात सर्वात मोठे फ्रेंच बनावटीचे विमान
4 hours ago
1
विमान उडवण्यासाठी शक्ती नव्हे, तर युक्ती अन् सूक्ष्म व्यवस्थापन लागते... हे म्हणणे आहे, देशातील सर्वात मोठे फ्रेंच बनावटीचे ए-३२० विमान (क्षमता ३१६ प्रवासी व १५ क्रू सदस्य) उडवणाऱ्या कॅप्टन नीलम इंगळे-लोबो यांचे.. देशातील सर्वात मोठे विमान उडवणाऱ्या अहिल्यानगरच्या या कन्येने देशातील महिलांची मान गर्वाने उंचावली आहे. कॅप्टन नीलम यांचे मूळ गाव खर्डा. कक्कय्या (ढोर) समाजातील त्या पहिल्या महिला वैमानिक.. कॅप्टन नीलम यांना लहानपणापासून जग पाहण्याची उत्सुकता होती. वैमानिकाचा गणवेश, शिस्त पाहून त्यांनी लहानपणीच वैमानिक होण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी सायकल, बैलगाडी, दुचाकी अन् चारचाकीही चालवली. इतकेच नव्हे, तर रेल्वे प्रवासात लोको पायलटकडे जाऊन रेल्वे कशी चालवतात, याचीही माहिती घेतली. आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या, मात्र त्यांचा कल वैमानिक होण्याकडेच होता. मात्र, त्याला घरच्यांचा विरोध होता. अखेर घरच्यांनीही त्यांना वैमानिक होण्यास होकार दिला. बारावीनंतर त्यांनी रायबरेलीच्या एअर पायलट ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॅप्टन नीलम या क्षेत्रात २२ वर्षांपासून आहेत. जगभरातील तब्बल ५० देशांत विमानातून प्रवाशांना सुखरुपपणे पोहोचवले आहे. त्या आज कॅप्टन एअर इंडियाचे एअरबस ए-३५० हे सर्वात मोठे विमान घेऊन विदेशात जातात. त्या कमांडर तर आहेतच, शिवाय प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाली आहे. भारतातील अव्वल पायलटमध्ये त्यांचा समावेश होतो. फ्रेंच बनावटीचे ए-३२० विमान अधिक तंत्रसज्ज व बुद्धीकुशल आहे. त्यामुळे त्यावर ताबा मिळवणे तितकेच अवघड. मात्र, ते विमानही नीलम या सहज हाताळतात. त्यामुळे त्या विमानाला ‘लेडी लाइक’ म्हटले जाते. नीलम यांचे पती रॉबिन लोबो हेही कमांडर प्रशिक्षक आहेत. ते अमेरिकन बोईंग ७७७ हे विमान उडवतात. कक्कय्या समाजातील नीलम यांनी आज वैमानिक क्षेत्रात देशाचा झेंडा अटकेपार नेला आहे. २००८ मध्ये हैदराबादहून शारजाला नीलम या विमान नेत होत्या. अरबी समुद्रावरुन उड्डाण करताना विमानातील प्रेशरायझेन फेल (हवेचा दाब) झाले होते. उंच उंच जाताना हवेचा दाब कमी होत जातो. त्यावेळी दाबानुकुलित यंत्रणा महत्त्वाची असते. मात्र, ती फेल झाल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क होत नाही. त्यावेळी त्यांनी अत्यंत कुशलपणे या संकटाला सामोरे जात प्रवाशांना सुखरुप उतरवले होते. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे प्रवाशांनी कौतुक करीत त्यांचे आभार मानले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)