मकोका गुन्हेगाराची जामिनावर सुटका होताच दहशतवादी कारवाई:धानोरीतील हॉटेल मालकाला 15 हजारांसाठी मारहाण, 8 जणांविरुद्ध गुन्हा

3 hours ago 1
पुण्यातील धानोरी परिसरात मोक्का कारवाईतून नुकताच जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. रोहन अशोक गायकवाड या गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह हॉटेल अमिरमध्ये शिरून मालक आणि व्यवस्थापकाला मारहाण करून दरमहा १५ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गायकवाडवर खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे आणि खंडणी वसुलीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नुकत्याच मिळालेल्या जामिनानंतर त्याने पुन्हा गुंडगिरीला सुरुवात केली. हॉटेल अमिरमध्ये प्रथम जेवणासाठी आलेल्या गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी इतर ग्राहकांशी वाद घालून त्यांना बाहेर हाकलले. हॉटेल मालक अन्सार शेख (३२) यांनी मध्यस्थी करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळानंतर गायकवाड आठ-दहा साथीदारांसह परतला आणि हॉटेलमध्ये तोडफोड सुरू केली. व्यवस्थापक शरीफ शेख यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करून त्यांना जखमी केले. विमानतळ पोलीस ठाण्यात गायकवाड, गणेश राठोड आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक फरार आरोपींचा शोध घेत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article