अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांनाच जबाबदार धरण्यात आलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
बदलापूच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी ठरला. मात्र या संदर्भातील बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला ५ पोलीस जबाबदार असल्याचे उच्च न्यायालयानेम्हटलं आहे. तर गुन्हा दाखल करून कारवाई करा, असे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. तर ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून मुंबई उच्च न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नसल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, एका दुसऱ्या प्रकरणात अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात घेऊन जात असताना रस्त्यातच एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय शिंदे मारला गेला असं पोलिसांनी दावा केला होता. मात्र हा दावा न्यायालयात टिकला नाही. बघा यासंदर्भातील व्हिडीओ
Published on: Jan 20, 2025 01:51 PM