वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना दिलासा देत धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिला. करुणा शर्मा यांना १,२५,००० तर मुलगी शिवानी मुंडेला ७५,००० ची पोटगी देण्याचा अंतरिम निर्णय कोर्टाने दिला. तर आपणच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून पोटगी मान्य झाल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलंय.
करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने धनंजय मुंडे यांना करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रेतील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना १,२५,००० आणि मुलगी शिवानी मुंडे यांना ७५,००० ची पोटगी देण्याचा अंतरिम निकाल दिला. धनंजय मुंडेवर करुणा शर्मानी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आले. प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत. धनंजय मुंडेनी करुणा मुंडेना महिन्याला १,२५,००० रुपये द्यावेत. मुलगी शिवानी मुंडेला महिन्याला ७५,००० रुपये लग्नापर्यंत द्यावेत. हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या हिशोबाने देण्यात यावेत. या खटल्याचा २५,००० रुपयांचा खर्च देखील धनंजय मुंडेनी करुणा शर्मा यांना द्यावा.
करुणा शर्मांनी आपल्या याचिकेत काय म्हटलं?
करुणा शर्मांनी आपल्या याचिकेत म्हटलंय धनंजय मुंडे सोबत ९ जानेवारी १९९८ ला लग्न केलं. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात धनंजय मुंडे सोबत मध्य प्रदेशातल्या इंदूर मध्ये आणि त्यानंतर मुंबईत राहत होते. २०१८ पर्यंत सर्व काही सुरळीत होतं पण २०१८ पासून धनंजय मुंडेच्या वागण्यात बदल झाला आणि त्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली. धनंजय मुंडेनी राजश्री मुंडे सोबत दुसरं लग्नही केलं होतं. समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावातून आपण दुसरं लग्न केल्याचं धनंजय मुंडेनी सांगितलं होतं. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची तक्रार केली नव्हती. धनंजय मुंडे सोबत मुळगावी राहण्याची विनंती केली त्यांनी नकार दिला. माझं राजकीय जीवन उद्धवस्त होईल असं सांगत धनंजय मुंडेनी त्यावेळी धमकी दिली होती. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर करुणा शर्माने आरोप केला. धनंजय मुंडे समोर वाल्मिक कराडने मारलं असा आरोप करुणा शर्माचा आहे.
Published on: Feb 07, 2025 11:18 AM