महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् नाशिकमध्येPudhari News Network
Published on
:
07 Feb 2025, 8:39 am
Updated on
:
07 Feb 2025, 8:39 am
नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज (दि. ७) पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्काराचे वितरण व सायंकाळी सात वाजता गोदाआरती करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.7) दुपारी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ढिकले वाचनालय ते रामकुंड या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रामकुंड परिसर 'नो व्हेईकल झोन' असणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.
राज्यपाल राधाकृष्णन् हे रामकुंडावर शुक्रवारी (दि.7) सायंकाळी येणार आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून आणि दाेन्ही प्रमुख कार्यक्रमासाठी माेठी गर्दी हाेणार असल्याने पाेलिस आयुक्तालयायह वाहतूक विभागाने बंदाेबस्त आणि वाहतूकीचे काटेकाेर नियाेजन केले आहे. पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदाेबस्त नियोजन केले आहे. रामकुंड भागातील वाहतूक काेंडी टाळण्यासाठी दुपारी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत या मार्गावर नाे व्हेईकल झाेन घाेषित करण्यात आला आहे. रामकुंड परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ढिकले वाचनालय-रामकुंड मार्ग
मालेगांव स्टॅण्ड-रामकुंड मार्ग
सरदार चौक-रामकुंड मार्ग