कवठेमहांकाळ येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील फरशा फुटल्या आहेत. Pudhari Photo
Published on
:
30 Jan 2025, 2:26 pm
Updated on
:
30 Jan 2025, 2:26 pm
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कार्यालयातल्या फरशा उचकटल्या असून काही फरशा फुटलेल्या आहेत. या अवस्थेत कार्यालयातील कामकाज सुरू आहे. कवठेमहांकाळ कृषी विभागाच्या कार्यालयातील खराब स्थिती शेतकऱ्यांच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
जर कृषी विभाग आपल्या कार्यालयाचा दर्जा सुधारू शकला नाही, तर शेतकऱ्यांसाठी काय विकास कार्य करू शकते? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. कृषी विभागातील सुधारणांचा अभाव, त्याच्या कार्यप्रणालीतील त्रुटी आणि असंवेदनशीलता यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. ही स्थिती फक्त कार्यालयातील अपुऱ्या सोयीसुविधांची नसून, तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करते. शेतकऱ्यांच्या हितासाठी या कार्यालयातील विकासात्मक कामकाजांमध्ये तातडीने सुधारणा होणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये या बाबतीत नाराजी असून शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या कृषी अधिकारी कार्यालयातील मोडतोड तात्काळ दुरुस्त करावी व संबंधित विभागातील कामकाज ही गतिमान व्हावे, अशी मागणी नागरिकांना मधून होत आहे.
कृषी विभागाच्या कार्यालयातील या दयनीय अवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या विभागाने आपली कामकाजी पद्धत आणि सोयीसुविधा सुधाराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाईल.
सुरज पाटील - स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुका अध्यक्ष