काँग्रेसने दगाबाजीने उमेदवार जाहीर केला:खासदार प्रणिती शिंदेंनी फसवले, काँग्रेसच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारास मते कमी, जागा गेली
2 hours ago
1
विधानसभा या निवडणुकीत शरद पवार यांच्या विचारधारेवर आम्ही काम केले आहे. त्यांनी जो आदर्श बांधून दिला त्याप्रमाणे आम्ही प्रामाणिक काम केले. मंगळवेढा शहरातून काही मोजकेच पदाधिकारी सोबत घेऊन कामाला सुरुवात केली. आमची संघटना विस्कळीत झाली असल्याचे आम्हाला जाणवले. मात्र येथील प्रस्थापितांविरोधात लोकांत प्रचंड चीड निर्माण झाली होती. शरद पवार यांचा हक्काचा मतदारसंघ असताना काँग्रेसने दगाबाजी करून उमेदवारी जाहीर केली. आम्ही उमेदवारी एकच राहण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण शरद पवार यांनी हक्काचा मतदारसंघ आहे, निवडणूक पूर्ण ताकदीने लढा म्हणून सांगितले होते, राहुल शहा म्हणाले. ते मंगळवेढ्यात महाविकास आघाडीच्या विचारमंथन बैठकीत बोलत होते. या वेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी, कार्याध्यक्ष संतोष रणदिवे, प्रथमेश पाटील, काँग्रेस नेते फिरोज मुलाणी, बबन ढावरे आदी उपस्थित होते. संग्राम माने यांनी ३५ गावच्या पाणी प्रश्नाविषयी आवाज उठवण्यासाठी एकत्र येण्याचे सांगितले. तर डोणज येथील प्रकाश बंदाई यांनी अपयशी यशाची पहिली पायरी आहे. उमेदवारी जाहीर करण्यात वेळ लागल्यामुळे मतदारापर्यंत पोहोचता आले नाही. भविष्यात नियोजन करून पुढे जावो अशी सुचवले. स्मिता माळी यांनी कन्नडमधून भाषण करून अनिल सावंत यांच्यासारखा कर्तबगार उमेदवार राष्ट्रवादीने दिला असल्याचे सांगितले. या वेळी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्राणिती शिंदेंनी आघाडी धर्म पाळला नाही खासदार प्राणिती शिंदे यांना आमच्या मतदारसंघातून लोकसभेला ४५ हजारांचे मताधिक्य आम्ही सर्वांनी मिळवून दिले. हे केवळ भालके यांनी मिळवून दिले नाही तर यात आमचे पण योगदान आहे. निवडणुकीत भालके यांनी मतदारात संभ्रम निर्माण केला. प्रणिती शिंदे यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. शेवटच्या दोन दिवसात विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, असे साहेबराव पवार म्हणाले. पुढील सर्व निवडणुका ताकदीने लढवणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले कुणीच कमी पडले नाही. अपयशाची जबाबदारी मी स्वतः उमेदवार म्हणून घेत असून येणाऱ्या नगरपालिका,पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या ताकदीने लढणार. साधी ग्रामपंचायत निवडणूकही लढवली नाही. थेट विधानसभा लढवली, असे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)