कार्यकर्त्यांवर निवडणूक सोडून देऊ नका:नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

1 hour ago 1
२०१४च्या निवडणुकीत भाजपाने विदर्भातील ४२ जागा जिंकल्या होत्या. तिच परिस्थिती आजही आहे. हीच ग्राऊंड रिॲलिटी आहे. आता फक्त नेत्यांनी निवडणुकीची जबाबदारी घेतली पाहिजे. बुथ प्रमुख, शक्ती प्रमुखांवर निवडणूक सोडून देऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना केले. आपण पुन्हा महाराष्ट्र जिंकू शकतो. मात्र नेत्यांनी कार्यकर्त्यांवर निवडणूक न सोडता स्वत: जबाबदारी उचलली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेवून भाजपाने महायुतीचे सरकार स्थापन केले. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी पदोपदी दिसत आहे. लोकसभा निवडणुकीचा विरोधात गेलेला निकाला सुद्धा हेच कारण महत्त्वाचे असल्याचा तर्क लावल्या जात आहे. याचे उत्तर देताना फडणवीस यांनी महायुतीचे सरकार स्थापन करण्यामागील कारण सांगितले. राज्यात पाच वर्ष भाजपचे सरकार होते. या दरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. महाराष्ट्रासह विदर्भाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केले होत्या. मात्र महाविकास आघाडीने त्या बंद पाडण्याचे काम हाती घेतले होते. भाजपच्या नेत्यांचे खच्चीकरण सुरू केले होते. पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिले असते तर आगामी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला असता. आज महायुतीच्या सरकारमुळे आपल्याला विधानसभेचा निकाल आपल्या बाजूने दिसत आहे, असे ते म्हणाले. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, या दरम्यानही आपण राज्याच्या विकासाचे आणि सर्वासामान्यांचे हिताचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे पुढची पाच वर्षे आपलेच सरकार येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्ता बैठकीत सांगितले. आरोप करणे आणि खोटे नॅरेटिव्ह निर्माण करणे हे विरोधकांचे कामच आहे. ते प्रत्येकच गोष्टीत नकारात्मकता शोधीत असतात. आता आपणही त्यांना माहिती घेवून प्रत्त्युतर दिले पाहिजे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article