कुंभळवणे पिकअप अपघातातील जखमींची भरत गोगावलेंनी घेतली भेट; प्रकृतीची केली विचारपूसFile Photo
Published on
:
08 Feb 2025, 7:43 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:43 am
पोलादपूर : समीर बुटाला
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गवरील कुंभळवणे गावाच्या जवळ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. या जखमींवर उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी सांगली जिल्ह्यातील भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत असल्याची माहिती महाड ग्रामीण रुग्णालय मधून देण्यात आली. जखमींची विचारपूस व घटनेची माहिती भरतशेठ गोगावले यांनी घेतली. तसेच जखमींना दिलासा दिला. त्यांनी आ. विश्वजित कदम याच्याशी संपर्क साधत अपघाताबाबत माहिती दिली व जखमींना सांगलीला शिफ्ट करत असल्याची माहिती दिली.
कुंभळवणे गावाजवळ तीव्र वळणावर झालेल्या अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या नंतर काही रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींना घटनास्थळापासून रुग्णालयापर्यत प्रतापगड रेस्क्यू , काळभैरवनाथ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पोलादपूर अध्यक्ष दीपक उत्तेकर, शिवसेनेचे सिद्धेश पाटेकर युवा सेना महाड शहर अध्यक्ष सिद्धेश मोरे यांच्यासह सहकाऱ्यांनी तातडीने सहकार्य करत मदतकार्य केले.
शनिवारी सकाळी भरतशेठ गोगावले यांनी जखमींची भेट घेत त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांची महिती घेतली. सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी सांगली येथील भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करत असल्याचे सांगत रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिल्या.
अनेक धारकरी यांच्या हाताला पायाला तर काहीजणांच्या डोक्याला मार लागला असल्याने त्यांच्यावर दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ग्रामीण रुग्णालयात मधील वैद्यकीय अधिकार्यांनी बोलताना सांगितले.