Published on
:
23 Nov 2024, 12:50 am
Updated on
:
23 Nov 2024, 12:50 am
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी महसूल व पोलिस प्रशासन सज्ज झाले झाले असून 14 टेबलांवर 20 फेर्यामध्ये सर्व 279 केंद्रांची मतमोजणी (मालवण तालुक्यापासून सुरुवात) पूर्ण करण्यात येणार आहे. मतमोजणी निरीक्षक म्हणून उत्तर प्रदेश केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी पुष्कराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिली.
शनिवारी सकाळी 5 वा.ते 6 वा. या वेळेत मतमोजणीकरिता असलेल्या कर्मचार्यांसाठी टेबल निश्चित करून दिले जातील. काउंटिंग स्टॉप, काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट, मायक्रो ऑब्जर्वर असे कर्मचारी प्रत्येक टेबलवर नियुक्त करण्यात आले आहेत. ईव्हीएमची काउंटिंग करण्यासाठी साधारणतः 14 टेबल आहेत. 20 फेर्यामध्ये मतमोजणी होणार आहे. पोस्टल बॅलेट आणि ईटीपीबीएससाठी (सैनिक मतदार मतपत्रिका) एकूण 5 अधिक 1 अशी 6 टेबलांची रचना केली आहे. अशी 14 टेबल आणि पोस्टल बॅलेटची 6 टेबल मिळून 21 टेबलावर काऊंटिंग सुपरवायझर, पोस्टल बॅलेटसाठी प्रत्येक दोन-दोन असिस्टंट आहेत. प्रत्येक टेबलवर मायक्रो ऑब्झर्व्हर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8 वा. मतमोजणीला सुरुवात होऊन संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.(Maharashtra assembly poll)
सिक्युरिटी अरेंजमेंटसाठी पोलिस विभाग सज्ज आहे. साधारणतः 250 पोलिसांचा फोर्स मतमोजणी केंद्रासभोवताली सज्ज राहणार आहे.त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पोलिसांचा समावेश आहे. दोन प्रमुख उमेदवारांच्या गटांना सुरक्षिततेच्या द़ृष्टीने बाहेर विरुद्ध दिशेला जागा निश्चित करून ठेवण्यात आली आहे. जेणेकरून दोन्ही गटात वाद होणार नाही. जे काउंटिंग प्रतिनिधी आहेत त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा निश्चित केली आहे. कोणत्याही परिस्थितीत जमाव जमणार नाही, गर्दी होणार नाही, त्यादृष्टीने पोलिस यंत्रणनि दक्ष रहावे याबाबत आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांसाठी सुद्धा स्वतंत्र कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.
प्रांताधिकार्यांचे कर्मचार्यांना मार्गदर्शन
मतमोजणी करणार्या कर्मचार्यांना प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी प्रशिक्षण दिले. मतमोजणी कशाप्रकारे केली जाणार तसेच काही समस्या उद्भवल्यास काय करावे? याबाबत श्रीमती काळुसे यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.(Maharashtra assembly poll)