कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पुण्यामध्ये आरोप:छोट्या पवारांसोबत राहिल्याने माझे राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न

2 hours ago 2
छोट्या पवारांसोबत राहिल्याने माझे वैयक्तिक, सामाजिक आणि राजकारण अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत आणखी ते प्रयत्न करत राहतील. पण जनतेने माझ्यासोबत राहावे, मग बाकीच्या गोष्टी मी पाहतो. मी कधी कोणाची जात काढली नाही पण माझ्यामुळे काही जण आज जात काढत आहे. मी कोणाला कधीच घाबरत नाही. कारण जनतेसाठीचे माझे काम प्रामाणिक आहे. ज्यांनी अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.परळी येथील पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिक यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित स्नेह मेळाव्यात बोलत होते. मुंडे म्हणाले, मी १२ वी नंतर परळीमध्ये कृषी शिक्षण घ्यावे, असे वडिलांना वाटत होते तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना वाटत होते मी डॉक्टर झाले पाहिजे. पण माझी इच्छा होती की, पुण्यात येऊन वकील व्हावे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यात आलो. राज्यभरातील मित्र माझे या ठिकाणी झाले. जीवनात कधी जातपात,धर्म,पंथ मला शिवले नाही. राजकारणात कधी कोणाशी टोकाचे वैर झाले नाही. मी किंवा माझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे राजकारणात येऊन मोठे व्हावे ही इच्छा ठेवली नाही, असेही ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article