Published on
:
20 Nov 2024, 11:34 pm
Updated on
:
20 Nov 2024, 11:34 pm
नवी दिल्ली : कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक जीवनसत्त्वांपैकी एक आहे. जिथे कुणाच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तिथे त्याला हाडांशी संबंधित अनेक आजारही होतात. म्हणूनच तज्ज्ञ आणि डॉक्टर म्हणतात की, प्रत्येकाने कॅल्शियम समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे, जेणेकरून रोगांशी लढण्यास मदत होईल. कॅल्शियमच्या कमतरतेने होणार्या काही आजारांची ही माहिती.
मुडदूस : शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास मुडदूसचा धोका वाढतो. ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, त्यांना मुडदूसचा त्रास होऊ शकतो. मुडदूसमुळे हाडे ठिसूळ आणि लवचिक होतात. शारीरिकदृष्ट्या अशक्तपणा जाणवेल. त्यामुळे शरीरात कॅल्शियम कमी आहे असे वाटत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा.
ऑस्टिओपोरोसिस : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस होतो. ज्यामध्ये हाडे कमकुवत होऊ लागतात. शरीरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पाठदुखी, कंबर, मान आणि बोटांच्या सांध्यातील वेदना वाढतात. कॅल्शियमच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केल्यास नंतर हाडे तुटायला लागतात आणि शरीरात वेदना होत राहतात.
नैराश्य : जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्या व्यक्तीला नैराश्याचा त्रास होऊ शकतो. कारण कॅल्शियमच्या कमतरतेमुळे संपूर्ण शरीरात वेदना होत राहतात. मेंदूचे कार्यही बिघडते आणि लोक नैराश्याने ग्रस्त होतात.
स्नायूत गोळे : शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूत क्रॅम्पचा म्हणजेच हाता-पायात गोळे येण्याचा धोका वाढतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू मऊ होतात आणि क्रॅम्प्सची शक्यताही वाढते. इतकेच नाही तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाय दुखणेही कायम राहते.