कोकणच्या विकासासाठी मोठी घोषणा:साडेतीन हजार कोटींची कामे मंजूर; स्थानिकांना उद्योगांमध्ये 35% आरक्षणाचे आश्वासन

6 hours ago 1
कोकण विभागाच्या विकासासाठी मोठी घोषणा करत गृह आणि महसूल मंत्री योगेश कदम यांनी पंचवार्षिक योजनेत साडेतीन हजार कोटींची कामे मंजूर केली असून, ती रक्कम पाच हजार कोटींपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. पिंपरी येथे कोकणवासीय मित्र परिवारांतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री कदम यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि कोकणाचा विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. या विषमतेचा अंत करण्यासाठी कोकणातील प्रलंबित धरणांची कामे पूर्ण करणे, नवीन उद्योग आणणे आणि रोजगार निर्मिती यावर भर देण्यात येणार आहे. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोकणातील प्रस्तावित व प्रलंबित धरणांच्या कामांबाबत पत्र दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्गुरु कदम यांनी दापोली-मंडणगड एमआयडीसीमध्ये येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांसाठी 35 टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी केली. तसेच पुणे-पिंपरी चिंचवडमधील कोकणवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी दरमहा एक दिवस राखीव ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे माजी सदस्य, माजी नगरसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मंत्री कदम यांनी मतदारसंघातून मिळालेल्या मोठ्या विजयाबद्दल आभार व्यक्त करत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article