सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मंगळवारी अनेक मुद्यांवर रोखठोक मतं मांडली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय, महाकुंभातील चेंगराचेंगरी, मोदी सरकारच्या कार्यकाळाविषयी थेट भाष्य केले. दिल्ली विधानसभा निवडणूक आणि महाकुंभाविषयी अण्णा हजारे यांनी त्यांचे मत मांडले आहे. राजकारणात नैतिकता आणि त्याग अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.
हा तर लोकांचा विश्वास
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार मोठ्या विजयासह सत्तेवर आले. त्यावर अण्णांनी भाष्य केले. लोकांच्या विश्वासामुळेच सरकार सत्तेवर आल्याचा दावा त्यांनी केला. कोणताही पक्ष वा संघटनेत आचार, विचारची शुद्धता, त्याग आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते. त्यांचे समर्थन करते, मतं देते, असे ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा
उद्धव ठाकरेंबाबत मोठे विधान
राजकारणात योग्य दृष्टिकोन आणि नैतिकतेची गरज असते. जेव्हा लोक त्याग आणि सत्याच्या मार्गावर चालणारे नेते पाहतात. तेव्हा त्यांचे समर्थन करतात, असा दावा त्यांनी केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, आपण त्यांच्या जवळ सुद्धा जात नसल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली. राजकारणाशी आपले काही देणे घेणे नाही, असे ते म्हणाले. मी कोणत्याच पक्षाशी जोडलेलो नाही. पण कुठे चूक दिसत असेल तर आवाज उठवतो, सल्ला देत नाही, असे ते म्हणाले.
अध्यात्माची वेगळी व्याख्या
अण्णा हजारे यांनी धार्मिक दृष्टिकोनावर मत मांडलं. अध्यात्म माणसाला बदलू शकत नाही. केवळ गळ्यात माळ घातली, ती जपली म्हणजे माणूस धार्मिक होतो असे नाही. तर दु:खी आणि पीडितांची सेवा करणे हे खरं धार्मिक कार्य असल्याचे ते म्हणाले. हीच देवाची पूजा आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे जगण्याचे ध्येय माहित असेल तर समाज आणि देशाला फायदा होऊ शकतो.
पंतप्रधान मोदींची केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अण्णा हजारे यांनी कौतुक केले. त्यांनी अनेक चांगले कायदे आणले. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवला. कायदे कठोर असेल तर समाजात सुधारणा होते, असे अण्णा म्हणाले. तर महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत, लोकांचा जसा चष्मा तसे दिसते असे ते म्हणाले.