कोल्हापूर ः ‘मोकां’तर्गत (महाराष्ट्र गुन्हेगारी संघटित नियंत्रण कायदा) कारवाई टाळण्यासाठी गेली अनेक वर्षे फरार असलेला मटकाबुकी सम्राट सुभाष कोराणे (वय 41, रा. वेताळमाळ तालीमजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) हा अखेर बुधवारी (दि. 5) कोल्हापूर जिल्हा न्यायालयात शरण आला. त्यानंतर पोलिसांनी सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून कळंबा कारागृहात त्याची रवानगी केली. कोल्हापूर जिल्हा पोलिस गुरुवारी (दि. 6) त्याला तपासासाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी एप्रिल 2019 मध्ये मटकामालकांवर ‘मोकां’तर्गत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यात राज्यभरातील तब्बल 44 जणांचा समावेश होता. त्यापकी 42 जणांना अटक झाली. मात्र, कोराणे हा फरार होता. कोराणे याने कोल्हापूर पोलिसांच्या कारवाईला विशेष ‘मोका’ न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले होते. सर्वच न्यायालयांनी याचिका फेटाळल्यानंतर कोराणे याला शरण येण्याशिवाय पर्याय उरला नाही. दरम्यान, प्रकाश ऊर्फ पप्पू हिरजी सावला (रा. मुंबई) हा अद्याप पसार आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. या दोघांव्यतिरिक्त इतर 42 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. सध्या ते सर्वजण जामिनावर सुटले असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
8 एप्रिल 2019 रोजी प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने यादवनगरमधील सलीम मुल्ला याच्या मटकाअड्ड्यावर छापा टाकला होता. त्यावेळी मुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला चढविला होता. त्यामुळे राज्यभर हे प्रकरण गाजले. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी या प्रकरणाचा तपास केला. याप्रकरणी तब्बल 44 जणांविरुद्ध विशेष ‘मोका’ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, तेव्हापासून कोराणे फरार होता.
सर्वोच्च न्यायालयानेही खडसावलेे
कोराणे याने पोलिस कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 21 एप्रिल 2020 रोजी उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. तसेच, मुंबईतील सावला टोळीचा फरारी म्होरक्या प्रकाश ऊर्फ पप्पू सावला आणि सम—ाट कोराणे यांनी सर्वोच्च न्यायालयातही ‘मोका’ कारवाईविरोधात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने 19 सप्टेंबर 2020 रोजी आधी पोलिसांना शरण या, त्यानंतरच आव्हान याचिकेवर चर्चा होईल, अशा शब्दांत संशयितांना खडसावले होते.
पोलिसांनी 2019 मध्ये सलीम मुल्ला याच्या यादवनगर येथील घरावर छापा टाकल्यानंतर जमावाने पोलिसांवरच हल्ला केला होता. यावेळी पोलिसांची 9 एम.एम.ची सर्व्हिस पिस्टलही हल्लेखोरांनी लंपास केली. एक लाख रुपये किमतीच्या पिस्टलमध्ये 5 जिवंत काडतुसे होती. नंतर पोलिसांना तेथेच पिस्टल मिळाली. हल्लेखोरांनी पिस्टलचा वापर केला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. छाप्यातून पोलिसांनी दीड लाखासह इतर साहित्य जप्त केले होते.
1) माजी नगरसेविका शमा सलीम मुल्ला (वय 35, रा. यादवनगर, कोल्हापूर), 2) तौफीक सरदार शिकलगार (38, रा. सदर बाजार, कोल्हापूर), 3) सज्जाद इसाम नाईकवडी (51, रा. यादवनगर), 4) दिलीप वामन कवडे (40, रा. सदर बाजार), 5) फिरोज खलील मुजावर (51, रा. यादवनगर), 6) विजय मारुती सांगावकर (46, रा. शाहूनगर), 7) आरिफ रफीक शेख (24, रा. राजोपाध्येनगर), 8) आकाश लक्ष्मण पोवार (19, रा. यादवनगर) 9) जमीर साहेबजी मुजावर ऊर्फ मुल्ला (28, रा. राजारामपुरी), 10) शाहरूख रफीक लाड (24, रा. यादवनगर), 11) उमेर मुजाहिद मोमीन (20, रा. यादवनगर), 12) जावेद शौकत नाचरे (21, रा. यादवनगर), 13) अजय बाळासो कांबळे (43, रा. यादवनगर), 14) रोहित बाळू गायकवाड (30, रा. यादवनगर), 15) साहिल नियाज मुजावर (20, रा. यादवनगर), 16) ओंकार रवींद्र पारिसवाडकर (33, रा. यादवनगर), 17) श्रीधर शिवाजी कांबळे (23, रा. यादवनगर), 18) साहिल आमीन नदाफ (24, रा. यादवनगर), 19) इमाम आदम मुल्ला (40, रा. शास्त्रीनगर), 20) मुश्फिक निबीखान पठाण (21, रा. यादवनगर), 21) सुनील रावसाहेब दाभाडे (30, रा. यादवनगर), 22) नीलेश दिलीप काळे (32, रा. यादवनगर), 23) राजू यासीन मुल्ला (36, रा. यादवनगर), 24) सुंदर रावसाहेब दाभाडे (26, रा. यादवनगर), 25) सलमान ऊर्फ टिपू आदम मुल्ला (25, रा. यादवनगर), 26) सलीम यासीन मुल्ला (42, रा. यादवनगर), 27) फिरोज यासीन मुल्ला (28, रा. यादवनगर), 28) अभिजित अनिल येडगे (30, रा. यादवनगर), 29) जावेद यासीन मुल्ला (36, रा. यादवनगर), 30) राकेश मदनलाल अग्रवाल (47, रा. मथुरानगर, सांगली रोड, इचलकरंजी), 31) झाकीर अब्दुल मिरजकर (49, रा. शामरावनगर, सांगली), 32) अंकुश मारुती वग्रे (29, रा. कोरोची), 33) शरद देवासराव कोरोणे (42, रा. वेताळमाळ तालीम, कोल्हापूर), 34) सुरेश जयवंत सावंत (31, रा. प्रसाद कॉलनी, कोल्हापूर), 35) मेघराज एराप्पा कुंभार (40, रा. गणेश कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), 36) जयेश सेवांतीलाल शहा (54, रा. मुंबई), 37) शैलेश गुणवंतराव मणियार (60, रा. मुंबई), 38) विरल प्रकाश सावला (60, रा. मुंबई), 39) जितेंद्र ऊर्फ जितू कांतिलाल गोसालिया (53, रा. मुंबई), 40) जयेश हिरजी सावला (50, रा. मुंबई), 41) राजेंद्र ऊर्फ राजू धरमसी दवे ऊर्फ टोपी (52, रा. मुंबई), 42) मनीष किशोर अग्रवाल (47, रा. कबनूर), 43) सम—ाट सुभाष कोराणे (रा. वेताळमाळ, शिवाजी पेठ), 44) प्रकाश ऊर्फ पप्पू हिरजी सावला (रा. मुंबई).