Published on
:
06 Feb 2025, 4:31 am
Updated on
:
06 Feb 2025, 4:31 am
जालना : जालना तालुक्यातील शेवगा येथे शिक्षकाने विध्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. या शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला.
वर्ग शिक्षकाने मुलीची छेड काढल्याची घटना घडल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत मुलीने घरी सांगितले. यानंतर शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला. यानंतर शिक्षकाला मौजपुरी पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यात बदलापूर येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. बदलापूरच्या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशानुसार सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसलेले नाहीत. जालन्यातील या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.