बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असल्याचे आरोप करत मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यंनी केला होता. या प्रकरणावरून धनंजय मुंडे खिंडीत सापडलेले असतानाचा आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. करूणा शर्मांनी लावलेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहेत. करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा झटका बसला आहे.
मात्र धनंजय मुंडेंवर आरोप लावणाऱ्या करूणा शर्मा नेमक्या कोण आहेत, त्यानी काय आरोप लावले होते, हे एकंदर प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.
ही बातमी अपडेट होत आहे.