Income Tax Budget 2025 : बजेट 2025 मधील नवीन घोषणेमुळे 12 लाखांपर्यंत कर लागणार नाही. तर 75 हजारांची कर सवलत पण मिळेल. पण या लोकांना आयकराची ही सवलत लागू होणार नाही. त्यांना कर द्यावा लागेल.
बजेटमध्ये करदात्यांसाठी नवीन कर रचनेअंतर्गत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आता करदात्यांना 12 लाख रुपयांपर्यंत आयकर भरावा लागणार नाही. अर्थात ही कमाई निव्वळ वेतनातून झालेली असावी.
तर कॅपिटल गेनमधून होणारी कमाई यामध्ये समाविष्ट नाही. म्हणजे इतर स्त्रोतातून तुमची कमाई भले 12 लाखांपेक्षा कमी असेल, पण तुम्हाला या कमाईवर आयकर भरावा लागेल.
कलम 87 ए नुसार आयकर मुक्तीचा हा मार्ग केवळ वेतनदारांनाच मिळेल. पगारा व्यतिरिक्त इतर स्त्रोतातून उत्पन्न होत असेल तर ती कमाई कॅपिटल गेन अंतर्गत येईल. त्यावर कर द्यावा लागेल. 12 लाख रुपयांपर्यंत आयकर न भरावा लागण्याचा फायदा पगारदारांना होईल.
शेअर बाजार, म्युच्युअल फंड, संपत्ती, अल्पकालीन कॅपिटल गेन यामाध्यमातून होणारी कमाई आयकराच्या परीघात येते. त्यावर साधारणपणे 20 टक्क्यांपर्यंत कर मोजावा लागेल.
इतर माध्यमातून कमाई करणाऱ्यांना कलम 87 ए अंतर्गत विशेष सवलत मिळणार नाही. त्यांचे उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी त्यांना आयकर द्यावा लागेल.