रिसोड (Washim):- एकीकडे राज्यतील वातावरण अस्थिर झालेले असताना अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj)वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडून इतिहाची मोडतोड केली. याबाबत रिसोड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गट संभाजी ब्रिगेड च्या वतीने रिसोड ठाणेदारांना निवेदन देऊन राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडून इतिहाची मोडतोड
याबाबत राज्यात आधीच सामाजिक अस्थिरता राजकीय गुन्हेगारी व अत्याचाराच्या घटना वाढीस लागलेल्या असताना भाजप व आरएसएस प्रणित सरकार अशा घटनांकडून लक्ष इतरत्र वेधण्यासाठी आपले प्यादे पुढे सरकवत असते. त्यापैकी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्रा वरून लाच देऊ आले असे वादग्रस्त विधान करून राज्यातील व देशातील समस्त शिवप्रेमीच्या भावना प्रचंड त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिसोड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण आरु, घनशाम मापारी, संजू भाऊ इरतकर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील खडसे जिल्हा सचिव शेख इसाक शेख परवेज कार्यध्यक्ष गजानन खंदारे यांचे सह निवेदन दिले.
वेळी डॉक्टर गजानन सानप डॉ.रामेश्वर रंजवे प्रवीण देशमुख अनिल नागरे किशोर नाळे, कैलास ठोकरे, गणेश देशमुख,हर्षल साबळे, राहुल मोरे गजानन व्यवहारेभीमराव शेजूळ, गणेश लिंगे, दिलीप चोपडे, इत्यादी ची उपस्थिती होती.