अन्न व औषधी विभागाच्या व्यावसायिकांना सूचना..!
गडचिरोली (Gadchiroli) : अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना व नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना न घेणाऱ्यांवर अन्न व औषधी प्रशासनाच्या (Food and Drug Administration) वतीने कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यात किरकोळ व्यावसायिकांसह स्वस्त धान्य दुकानदारांचाही समावेश असल्याने कारवाईची टांगती तलवार आहे.
जिल्ह्यामध्ये हजारांवर सक्रिय परवाना व नोंदणी धारक व्यावसायिक आहेत. काही अन्न व्यावसायिकांनी मुदतपूर्व परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याने अनेक परवानाधारक सक्रिय नसल्याचेही दिसून येते. सक्रिय परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 (Honorarium Act 2006) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
शहरी भागाच्च्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये काही व्यावसायिक परवाना न घेताच अन्नपदार्थांची विक्री करतात. त्यामुळे शासनाने (Government) ग्रामीण भागाकडेही अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तर काही व्यावसायिक एकाच परवान्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अन्नपदार्थ (Food) विकत असल्याचेही दिसून येते. यामुळे अशा दुकानांची तपासणी करून कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
येथे करा ऑनलाइन नोंदणी…
परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी foscos.fasal.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अन्न व्यावसायिकांनी व्यवसायासाठी त्वरित ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
यांना प्रमाणपत्र नोंदणी केली आहे बंधनकारक.!
पाणीपुरी, भेलपुरी, पावभाजी विक्रेते, आइस्क्रीम, बर्फ गोळा, ज्यूस, सरबत विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, किरकोळ किराणा, डेली नीडस, बेकरी, घाऊक विक्री करणारे वितरक व वाहतूकदार, गृह उद्योग ते अन्न पदार्थांचे उत्पादक, उपाहारगृह, हॉटेल, खानावळ, चहा विक्रेते, दूध विक्रेते, स्वस्त धान्य दुकानदार, केटरर्स, शालेय पोषण आहार पुरवठादार, बचत गट, शासकीय, अशासकीय कार्यालयातील कँटीन, वसतिगृहातील खानावळ, धार्मिक ठिकाणी वितरित होणारा प्रसाद, मेळावे व प्रदर्शनांमधील अन्न पदार्थाचे स्टॉलधारक इत्यादी व्यावसायिक (Professional) या वर्गवारीच्या कक्षेत येतात.