अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आपल्या भावाच्या लग्न सोहळ्यात व्यस्त आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सिद्धार्थचा हळदी समारंभ अगदी थाटा-माटात पार पडला. त्यानंतर आता कुटुंबाने मेहंदी समारंभ देखील उत्साहात साजरा केला. या प्रसंगासाठी प्रियांकाने पारंपरिक कपड्यांच्या ऐवजी आधुनिक पोशाख निवडला होता. तिच्या पोषाखाने सर्वांचे लक्ष वेधलं असलं तरी सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते तिच्या गळ्यातील चकचकणाऱ्या नेकलेसनं.
भावाच्या मेहंदी कार्यक्रमात प्रियांकाने घातलेल्या नेकलेसची चर्चा
प्रियांका चोप्राने तिच्या धाकट्या भावाच्या मेहंदी समारंभासाठी पारंपारिक साडी किंवा सूट न घालता, गाऊन निवडला. राहुल मिश्रा यांनी हा गाऊन प्रियांकासाठी डिझाइन केला आहे. या गाऊनचा रंग पांढरा रंगाचा होता, ज्यावर आकर्षक फ्लोअरलिंथ काम केले होते. त्यावर चमकदारपणा आणण्यासाठी क्लोज सिक्विन वर्क करण्यात आले आहे. रंगीबेरंगी धाग्यांपासून केलेल्या फुलांचे आणि पानांची नक्षी गाऊनला विशेष आकर्षक बनवते.
प्रियांकाचा मॉडर्न आणि आकर्षक गाऊन
प्रियांकाचा गाऊन पूर्णपणे मॉडर्न आणि आकर्षक होता. त्यात कॉर्सेट स्टाईल वापरली होती. गाऊनचे ऑफ शोल्डर डिझाइन आणि रुंद प्लेट्स होत्या. उत्कृष्टरित्या या गाऊनची रचना करण्यात आली होती. हा गाऊन थोडासा घेरदारही होता तसेच या गाऊनला पूर्णपणे फिनिशिंगही केली होती.
या सुंदर गाऊनवर प्रियांकाने हलकासा मेकअप केला होता आणि गळ्यात एक नेकलेस घातला होता. तिच्या हातात एक ब्रेसलेट घातले होते, तसेच तिने बोटांमध्ये हिऱ्याची अंगठीही घातली होती. या गाऊनमधील प्रियांकाचा लुक सर्वांच्याच नजरेत भरणारा होता. मात्र यात लक्ष वेधल ते तिच्या गळ्यातील नेकलेसमुळे.
चकचकणाऱ्या नेकलेसची किंमत जाणून थक्क व्हाल
प्रियांकाच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते पण विशेष लक्ष वेधले ते तिच्या गळ्यातील चकचकणाऱ्या नेकलेसने. प्रियांकाने घातलेली नेकलेस अतिशय सुंदर वाटत होता. या नेकलेसमुळे तिच्या सौंदऱ्यात अजून भर पडली होती. गाऊनसोबत, तिने हिरे आणि माणिक असलेले दागिने घालले होते. गळ्यात तिने एक आलिशान बल्गारी नेकलेस घातला होता. पण या नेकलेसची किंमत जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या चकचकणाऱ्या नेकलेसची किंमत ही तब्बल 10 कोटींच्या घरात आहे. प्रियांकाने घातलेल्या या मिनिमलिस्ट दागिन्यांमुळे तिचा लूक पूर्णपणे आकर्षक आणि मोहक दिसत होता. जो अत्यंत प्रभावी आणि मोहक वाटत होता.