व्हॅलेंटाइन्स डे आता जवळ आलाय. 7 ते 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीक संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीला रोज डे, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि त्यानंतर व्हॅलेंटाईन डे असे सात दिवस डे साजरे केले जातात. या खास प्रसंगी प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराला एकमेकांना रोज खास गिफ्ट्स देतात. हा आठवडा खास करण्यासाठी अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात. या निमित्ताने बहुतांश कपल्स एकमेकांना गिफ्ट्स देतात. पण शेवटी आपल्या जोडीदाराला खास वाटावं म्हणून गिफ्ट म्हणून काय द्यायचं? हा प्रश्न अनेकांच्या मनात रेंगाळत असतो. तर आज आम्ही या लेखात काही गिफ्ट आयडिया शेअर करणार आहोत. चला जाणून घेऊयात.
या गोष्टी लक्षात ठेवा
जोडीदाराच्या आवडीच्या गोष्टी लक्षात ठेऊन त्या त्यांना द्या. असे गिफ्ट्स नेहमीच खास असतात कारण त्या आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी किती चांगल्या प्रकारे माहित आहेत हे दर्शवतात. सर्वप्रथम तुमच्या जोडीदाराला आवश्यक असलेली गोष्ट भेट देणे अधिक चांगले आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या जोडीदाराला नवीन फोन घ्यायचा असेल तर आपण त्यांना फोन भेट देऊ शकता जो त्यांना नेहमीच उपयुक्त ठरेल.
र्सनलाइज्ड गिफ्ट्स
पर्सनलाइज्ड गिफ्ट्स या तुमच्या जोडीदाराला स्पष्टपणे दर्शवितात की तुम्ही गिफ्ट्समध्ये तुमचा वेळ आणि लक्ष केंद्रित केले आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने किंवा विशेष तारखेसह (जसे की तुमच्या भेटीची तारीख किंवा एखादा विशेष क्षण) काहीतरी ऑर्डर करू शकता. यात फोटो फ्रेम, कुशन, मग किंवा पेन यांचा समावेश असू शकतो. आजकाल थ्रेड वर्क फ्रेम्सही खूप ट्रेंडी आहेत.
हॅण्डमेड गिफ्ट्स
जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट करायला आवडत असेल तर तुम्ही हाताने बनवलेली वस्तू तयार करून गिफ्ट्स देऊ शकता. तुम्ही एक सुंदर कार्ड, स्केच किंवा पेंटिंग किंवा एक विशेष कस्टमाइज्ड अल्बम बनवू शकता जिथे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर घालवलेल्या वेळेबद्दल लिहून तुमच्या दोघांचे त्या क्षणाचे फोटो लावून अल्बम करू शकता. ही भेट तुमच्या भावना सोप्या आणि सुंदरपणे व्यक्त करतात.
ज्वेलरी गिफ्ट्स
ज्वेलरी हे महिलांसाठी नेहमीच मोठी भेट असते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर नेकलेस, झुमके किंवा ब्रेसलेट देऊ शकता. पुरुषांसाठी तुम्ही कस्टमाइज्ड घड्याळ, अंगठी किंवा चैन भेट देऊ शकता. मात्र हे लक्षात ठेवा की ज्वेलरीची निवड करण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि स्टाईलचा विचार करणं गरजेचं आहे.
कुकिंग क्लास किंवा डिनर सेट
तुमच्या जोडीदाराला स्वयंपाकाची आवड असेल तर कुकिंग क्लासची भेट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याव्यतिरिक्त एक सुंदर डिनर सेट, कुकिंग टूल्स किंवा किचन अप्लायंसेस देखील चांगली भेट म्हणून दिली जाऊ शकतात.
हेल्थ आणि फिटनेस गिफ्ट
जर तुमचा जोडीदार फिटनेस फ्रीक असेल तर तुम्ही त्यांना फिटनेस ट्रॅकर, योगा क्लास सब्सक्रिप्शन किंवा जिम व्हाउचर गिफ्ट करू शकता. हे गिफ्ट त्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन तर देईलच, शिवाय तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठीही हा एक चांगला पर्याय ठरेल.