कामाख्या देवीसमोर रेडे कापले त्यांची शिंग वर्षा बंगल्याबाहेरील लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत. इतकंच नाहीतर वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर देत राऊतांवर पलटवार केलाय.
“देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मनात कसली भिती आहे? इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे मुख्यमंत्री का जात नाहीत? याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे” असं म्हणत वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुख्मयमंत्री वर्षावर कधी जातील, याच्याशी तुमचं काय देणंघेणं’, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी संजय राऊत यांना सकाळचा भोंगा म्हणत अजित पवार यांना नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘एकनाथ शिंदेंनी बंगला सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस वर्षावर जात का नाहीत? यांना काय घेणं-देणं मुख्यमंत्र्यांनी कधी जायचं आणि कधी नाही ते….इतकंच नाहीतर वर्षा बंगला पाडून तिथे नवी बिल्डिंग बांधायची असं म्हणतात.. मुख्यमंत्र्यांच्या लेकीची दहावीची परीक्षा आहे. त्यामुळे तिने सांगितलं परीक्षा झाल्यावर जाऊ’, असं अजित पवार यांनी म्हणत संजय राऊत यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Feb 06, 2025 04:44 PM