अमेरिकेचा दुश्मन असलेल्या रशियाकडून भारत पाचव्या पिढीचा एजव्हान्स सुखोई Su-57 करणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या महिन्यात आयोजित एअरो इंडिया – २०२५ मध्ये रशियन फायटर जेट भारतात येत आहे. रशियाचा अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न आहे की भारताने हे विमान खरेदी करावे. परंतू दिल्लीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ताज्या माहीतीनुसार रशियन एअर फोर्सला 2025 पासून पाचव्या पिढीच्या स्टील्थ फायटर जेटच्या एडव्हान्स व्हेरिएंटची डिलिव्हरी सुरु होणार आहे. जगात तीनच असे देश आहेत ज्यांच्याकडे पाचव्या पिढीचे लढाऊ विमाने आहेत. अमेरिका, चीन आणि रशिया हे ते तीन देश आहेत. तुर्कीने देखील पाचव्या पिढीचे जेट तयार केले असून त्याची निर्मिती प्रक्रीया सुरु आहे.
एकीकडे पाकिस्तानने चीनकडून पाचव्या पिढीचे जेट खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारताच्या दोन्ही मोठ्या शत्रूंकडे पाचव्या पिढीचे अत्याधुनिक जेट असणार आहे. त्यामुळे भारतावर देखील हे अत्याधुनिक जेट फायटर विमान खरेदी करण्याचा मोठा दबाव आहे. चीनकडून हे विमान भारत कदापि खरेदी करु शकत नाही. अमेरिका त्यांचे विमान विक्रीसाठी जरी राजी झाला तरी अनेक अटी लादणार आणि रशियाचे जेट फायटर खरेदी केले तर अमेरिकेची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आणि वेळेत डिलिव्हरी होणार की नाही याची देखील चिंता भारताला लागली आहे.
Su-57 हे रशियाच्या शस्रास्र भंडारातील एकमेव पाचव्या पिढीचे जेट फायटर आहे. रशियाच्या गजरेनुसार याचे उत्पादन वाढविणे महत्वाचे आहे. चौथ्या पिढी पेक्षा हे नवीन सुखोई खूपच प्रगत आहे. आम्ही २०२५ पासून रशियन वायू सेनेला हे विमान पुरविण्याच्या तयारीत आहोत अशी अशी माहिती कोम्सोमोल्स्क – ऑन-अमूर एयरक्राफ्ट प्रोडक्शन एसोसिएशनचे ( KnAAPO ) संचालक यूरी कोंडराटयेव यांनी दिली आहे. परंतू त्यांनी या विमानाची वैशिष्ट्ये किंवा इतर माहिती दिलेली नाही. परंतू असे म्हटले जाते की यात एडव्हान्स AL-51F1 इंजिन बसविण्यात आले असून त्यामुळे नवे सुखोई शक्तीशाली झाले आहे.
येथे पाहा पोस्ट –
🇮🇳🇷🇺Su-57 is coming to India
🛦 India volition get the latest 5th-gen Su-57 combatant jets, with options for associated accumulation and processing its indigenous mentation – Rosoboronexport.
For the archetypal time, the Su-57 volition beryllium showcased astatine Aero India 2025, featuring objection flights. https://t.co/t0wnurTljd pic.twitter.com/Z5fBSCknuK
— Sputnik India (@Sputnik_India) February 6, 2025
स्टील्थ टेक्नोलॉजी
रशियाने अमेरिकेच्या फायटर जेट F-22 रॅप्टर आणि F-35 लाईटनिंग II ला आव्हान देण्यासाठी हे नवीन सुखोई Su-57 तयार केले आहे. F-35 लाईटनिंग II देखील फिफ्थ जनरेशन विमान आहे. रशियन विमानात अत्याधुनिक स्टील्थ टेक्नोलॉजी, सुपर मॅन्युवरेबिल्टी आणि एडव्हान्स एव्हीओनिक्स आहे. Su-57 शिवाय Su-35S देखील अपग्रेड करण्याची रशियाची योजना आहे.
रशियाचे चेकमेट फायटर जेट Su-75
रशिया वेगाने Su-57 आणि Su-35 लढावू विमानांचे देखील उत्पादन करीत आहे. याशिवाय T-75 च्या विकास देखील करीत आहे. Su-57 ला चेकमेट नावाने ओळखले जाते. चेकमेट प्रोजेक्टवर आमचा प्रमुख फोकस आहे. एसयू-75 चेकमेट हे पाचव्या पिढीचे हलके स्ट्रॅटजिक सिंगल-इंजिन स्टील्थ फायटर जेट आहे. हे रोस्टेकच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ( यूएसी ) चा एक भाग असलेल्या पीजेएससी सुखोईने डिझाईन केले होते. हे प्रथम रशियाच्या MAKS-2021 एअर शोमध्ये प्रदर्शित केले होते. दुबई एअर शो 2021 मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले होते. परंतू Su-57 प्रमाणे, चेकमेट Su- विकासात देखील अनेक अडथळे आले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधासह अनेक बाबींमुळे हा प्रकल्प देखील रखडला आहे.