बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तेवढच नाही तर बॉलिवूडमध्ये पदार्पणकेल्यापासून ते आतापर्यंत तिने तिचा अभिनयाचा ग्राफ एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. कंगनाचे असे अनेक चित्रपट आहेत जे तिच्या एकटीच्या खांद्यावर तिने पेलवले आहेत. कंगनाने अभिनयासोबतच दिग्दर्शन व राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
कंगनाचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण
कंगना कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने तर जिंकलीच आहे. बऱ्याचदा कंगना तिच्या घरी म्हणजे हिमाचलमधील घरी जास्त वेळ घालवताना दिसते. पण आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तेही तिच्या बिझनेसमुळे. कंगना आता बिझनेसवुमन देखील झाली आहे.
मनालीच्या सुंदर खोऱ्यांमध्ये कॅफे
कंगना रणौतने मनालीच्या सुंदर खोऱ्यांमध्ये आपला स्वतःचा कॅफे सुरु केला आहे. याची सुंदर झलक त्यांनी आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे.
कंगना यांनी ‘द माउंटन स्टोरी’या नावाने कॅफे आणि रेस्टॉरंट सुरु केलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कंगना बर्फाळ डोंगराळ भागातून आणि मेंढ्यांच्या कळपातून हॉटेलच्या दिशेन जाताना दिसत आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर दोन कर्मचारी तिचं स्वागत करतात. आतमध्ये बाहेरील बर्फाच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी शेकोटी लावण्यात आली आहे.
तसेच तिथे बसण्यासाठी सुंदर टेबल आणि खुर्चीही दिसत आहे. त्यानंतर तेथील काही स्थानिक व्यक्ती हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आल्याचेही दिसत आहे. त्यांच्यासमोर हिमालयातील विविध पारंपरिक पदार्थांची थाळी ठेवण्यात आली असून. शेवटी कंगना तेथील टेबल स्वत: आवरतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
कॅफेचे सुंदर फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर
हे सर्व काम करताना कंगनाचा आनंद हा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ती हे सर्व काम मानपासून एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे. या सुंदर कॅफेचे उद्घाटन 14 फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी करण्यात येणार आहे. कंगना रणौतने आपल्या नवीन कॅफेचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांने वेड लावले आहे.
आपल्या नव्या कॅफेचे उद्घाटन झाल्यानंतर तिची पहिली ग्राहक ही चक्क दीपिका पदुकोण असणार आहे का? असे पश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. कारण या निमित्ताने एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दीपिका पदुकोण असणार पहिली ग्राहक?
व्हिडीओमध्ये कंगना रणौत, दीपिका पदुकोण आणि विद्या बालन दिसत आहेत. तेव्हा होस्ट त्यांना विचारतो की, तुम्हाला 10 वर्षात काय करायचे आहे? यावर दीपिका पदुकोण म्हणते की, “मी जे करत आहे ते चालूच ठेवणार आहे.” मात्र यावर” कंगना रणौतने खास उत्तर दिले होतं. त्या म्हणाल्या होत्या की, “मला माझे स्वतःचे छोटे रेस्टॉरंट उघडायचे आहे. ज्यामध्ये जगभरातील मेनू असतील. मी वेगवेगळ्या ठिकाणांचे पदार्थ खाल्लेले आहेत. माझ्याकडे सर्व रेसिपी आहेत. मला जगात कुठेतरी स्वतःचा एक छोटासा कॅफेटेरिया उघडायचा आहे.” कंगनाचे हे उत्तर ऐकून दीपिका पदुकोण लगेच म्हणाली होती की, “मी तुझी पहिली ग्राहक असेन.” आता दीपिका पदुकोण कंगना रणौत यांच्या नव्या कॅफेची पहिली ग्राहक ठरेल का? हे पाहणे याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
चाहत्यांसोबत कॅफेची झलक शेअर करताना कंगना एक हटके कॅप्शन व्हिडीओला दिले आहे. तिने लिहिलं आहे की, “लहानपणीचे स्वप्न आज पूर्ण झाले, हिमालयाच्या कुशीत माझे छोटसं कॅफे असावं अशी इच्छा होती. द माउंटन स्टोरी, ही एक माझी लव्ह स्टोरी आहे. ” सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कंगनावर प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.