प्रातिनिधिक छायाचित्र file photo
Published on
:
06 Feb 2025, 1:38 pm
Updated on
:
06 Feb 2025, 1:38 pm
नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर वनपरिक्षेत्रात आदासाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तेलगाव तेलकामठी रस्त्याजवळ असलेल्या खुशाल नत्थु सगने यांच्या शेतात हा बिबट्याचा मृतदेह आढळला.
वनविभागाने केलेल्या तपासणीत मृत हा साडेतीन ते चार वर्षाचा नर बिबट असल्याचे आणि त्याच्या तोंडातून रक्तस्रा होत होता. त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचेही निदर्शनास आले. डॉ. अनिल दशहरे, उधमसिंग यादव, अविनाश लोंढे,डॉ. मयूर पावशे आणि गौरव बारस्कर यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक पांडुरंग पाखरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.