वीरेंद्र सेहवाग व मिताली राज यांची होणार फटकेबाजी!
बुलढाणा (Dharmaveer MLA Cup) : विदर्भातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा, म्हणजेच बुलढाण्यातील धर्मवीर आमदार चषक.. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक असते ७ लाख ७७ हजार ७७७ तर दुसरे पारितोषिक असते ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये, याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मॅन ऑफ द सिरीज आदी भरभक्कम बक्षीसे या (Dharmaveer MLA Cup) स्पर्धेचे विशेष आकर्षण असते. राज्यातले व राज्य बाहेरचे मो- मोठे खेळाडू यात सामील होत असतात. तर अंतिम सामन्यासाठी भारतीय पुरुष महिला संघातील खेळाडूंची विशेष उपस्थिती असते.
यावर्षी धर्मवीर आमदार चषक २०२५ बुलढाणा, या स्पर्धेचा अंतिम सामना इथे रविवारी म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या (Dharmaveer MLA Cup) अंतिम सामन्याकरिता भारतीय संघाचे तडाखेबाज फलंदाज राहून गेलेले वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) व भारतीय महिला संघाच्या सेहवाग समजल्या कप्तान मिताली राज (Mithali Raj) यांची विशेष उपस्थिती राहणार असून, त्यांची फटकेबाजी पाहण्याची संधी तमाम क्रिकेट रसिकांना मिळणार आहे.
धर्मवीर आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या नेतृत्वाखाली युवानेते कुणाल गायकवाड, धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तर पवनदादा भालेराव व विजय दुरणे तथा प्रसाद फदाट, उमेश बरडे व बाळा देशमुख,राजू पाटील, नितीन नेमाने, जीवन उबरहंडे, नितीन पाटील, विशाल खंडारे, स्वप्नील पाटील, सागर उबाळे तथा समालोचक ओम सोनुने व चेतन सोनुने आदींच्या आयोजनात ही स्पर्धा सुरू झालेली असून.. नावाजलेल्या संघांचा यात सहभाग आहे. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा सुरू आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवार फेब्रुवारी रोजी होणार आहे.
अंतिम सामन्यासाठी (Dharmaveer MLA Cup) भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आता भारतीय क्रिकेट संघाच्या कप्तान मिताली राज (Mithali Raj) यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे या दोघांना प्रत्यक्ष खेळताना जिजामाता पेक्षागाराच्या मैदानात क्रिकेट रसिकांना बघायला मिळणार आहे. भारतातील क्रिकेटर हे रसिकांसाठी दिवा पेक्षा कमी नसतात, त्यामुळे त्यांना जवळून पाहण्याचा योग यानिमित्ताने क्रिकेटर रसिकांना येणार आहे. तरी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन धर्मवीर आमदार चषक आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.