Published on
:
06 Feb 2025, 1:55 pm
Updated on
:
06 Feb 2025, 1:55 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली. मोहम्मद शमीने त्याला पदार्पणाची कॅप दिली. हर्षित राणा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणारा 258 वा खेळाडू आहे. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणाऱ्या निवडक खेळाडूंच्या यादीत हर्षित राणा सामील झाला. (Harshit Rana Embarrassing Record)
अशा परिस्थितीत, युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला. राणा हा त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
हर्षित राणाने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्याच षटकात 11 धावा दिल्या. यानंतर, त्याने शानदार पुनरागमन करत दुसरे षटक निर्धाव टाकले. पण तिसऱ्या षटकात इंग्लंडच्या स्फोटक फलंदाज फिल सॉल्टने राणाची धुलाई केली. इंग्लिश फलंदाजाने राणाच्या 6 चेंडूंवर 26 धावा वसूल केल्या. ज्यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. यासह, राणा भारतासाठी एकदिवसीय पदार्पणात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला.