कवी प्रा. अनंत राऊत यांचे प्रतिपादन..!
समुद्रपूर (Samudrapur) : ग्रामगीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा. ग्रामगीतेतील 41 अध्यायमध्ये भारतातील सर्वधर्म संत थोर महापुरुष व देवी देवतांचे साक्ष प्रमाण देऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा ग्रंथ आहे. गावापासून देशाची परीक्षा हा मोलाचा संदेश या युगातील संजीवनी बुटी ग्रामगीता (Buti Gramgeeta) ग्रंथामध्ये दिलेला आहे. असे प्रतिपादन कवी प्रा. अनंत राऊत (Anant Raut) यांनी केले. गिरड येथील श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रचारक वामनराव झिंगरे होते. उद्घाटक म्हणून गोभक्त अर्जुन तिरगम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच (Sarpanch) राजू नौकरकर, जिल्हाध्यक्ष (District President) मनीष जगताप गिरडचे ठाणेदार संदीप गाडे, प्रा. अभिजीत, किशोर कारंजेकर, निलेश पिंजरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रमणी ढेगळे यांनी केले.
काव्यात्मक प्रबोधनाच्या कार्यक्रमात जागर राष्ट्रसंतांच्या विचारधारेचा..!
प्रास्ताविक श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णू ब्राह्मणवाडे यांनी केले. जागर राष्ट्रसंतांच्या विचाराचा या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी समाज प्रबोधनकार प्रा. अंनत राऊत यांच्या लिखित मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्य 29 ते 31 जानेवारी पर्यंत करण्यात आले होते. यावेळी पोस्टर स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक मानसी वनारसे, द्वितीय क्रमांक नयन लाजूरकर, तृतीय क्रमांक वेदांत भांदककर, चतुर्थ क्रमांक आयुष भांदककर, पाचवा क्रमांक पियाली तेलरांधे, सहावा क्रमांक अवंतिका तेलरांधे, गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अथर्व शिवणकर, द्वितीय क्रमांक बादल बोरेकर, तृतीय क्रमांक सबा शेख, चतुर्थ क्रमांक परिधी चचाने, विदर्भस्तरीय दिंडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शंकरशाही भजन मंडळ भवनपूर, द्वितीय क्रमांक श्रावण बाबा महिला भजन मंडळ भिवी, तृतीय क्रमांक न्यू तरुण उत्साही भजन मंडळ गिरड, चतुर्थ क्रमांक श्री गुरुदेव महिला भजन मंडळ आलेसुर, पाचवा क्रमांक अनुसया माता महिला भजन मंडळ गिरड, सहावा क्रमांक मंजुळा माता भजन मंडळ गिरड, सातवा क्रमांक संत ज्ञानोबा माऊली महिला भजन मंडळ गिरड, आठवा क्रमांक सती सोनामाता भजन मंडळ गिरड, नवा क्रमांक विद्यार्थी माऊली भजन मंडळ गिरड, दहावा क्रमांक जय भोले शालिक बाबा भजन मंडळ गिरड, अकरावा क्रमांक सदुरु सोनामाता दुर्गा भजन मंडळ गिरड, बारावा क्रमांक सती अनुसया माता भजन मंडळ शिवणफळ ग्रामगीता ओवी भावार्थ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक उन्नती पाणबुडे, द्वितीय क्रमांक गुंजन गुडदे, तृतीय क्रमांक पूनम चंदनखेडे यांना प्राप्त झाले. बाल कीर्तनकार कुमार प्रसाद कैलास महाकाळकर यांचे राष्ट्रीय एकात्मता अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती या विषयावर प्रबोधनात्मक किर्तन झाले. संचालन पूजा अग्निहोत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजा तेलरांधे तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रणाली दीपक सायंकाळ, माया ढगे, कविता येनुरकर, मीनाक्षी शिवणकर, निर्मला दडमल, रेखा डरे, सोनल वाघ उपस्थित होते. ब्रह्मलीन वंदनीय महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. आदर्श शेतकरी विवेकदादा डंबारे यांना शाल शिरफळ ग्रामगीता सन्मानचिन्ह देण्यात आले. समाज प्रबोधनकार भाऊसाहेब थुटे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पढला.
दिंडी सोहळयात 15 दिंडी स्पर्धकांचा सहभाग..!
विदर्भस्तरीय भव्य दिंडी स्पर्धा व शोभा यात्रा (Shobha Yatra) गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. या स्पर्धेमध्ये परिसरातील 15 दिंडी स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी 12 बक्षीस ठेवण्यात आली होती. गोपाल काल्याचे कीर्तन (Kirtan) श्रीहरी महाराज घरतकर यांच्या हस्ते करण्यात आले.