वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंडला 248 धावांवर रोखलं. या सामन्यात इंग्लंडला पूर्ण 50 षटकं खेळता आली नाहीत. हार्षित राणाने पदार्पणाच्या पहिल्याच वनडे सामन्यात तीन विकेट घेत अनोखी हॅटट्रीक नोंदवली आहे.
वनडे मालिकेत संधी मिळाल्यानंतर पहिल्याच सामन्यात हार्षित राणाने आपल्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. या सामन्यात हार्षित राणाने 7 षटकं टाकली आणि 53 धावा देत 3 गडी बाद केले. यासह हार्षित एक खास हॅटट्रीक नोंदवली आहे.
1 / 5
हार्षित राणा क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला आहे. या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने पहिल्याच सामन्यात तीन किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा हार्षित राणा पहिला गोलंदाज ठरला आहे.
2 / 5
भारतीय संघ 1974 पासून वनडे सामने खेळत आहे. या 50 वर्षात हार्षित राणासारखी कामगिरी कोणीही करू शकलेला नाही. हार्षित राणाने कसोटीतील पहिल्या सामन्यात 4 विकेट घेतल्या. टी20 क्रिकेटमध्ये त्याला कन्कशन सब्सटीट्यूट म्हणून खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याने 3 विकेट घेतल्या. आता वनडेत पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट घेतल्या.
3 / 5
हार्षित राणाने तीन विकेट घेतल्या असल्या तरी 53 धावा दिल्या. बेन डकेटने त्याला एका षटकात 26 धावा ठोकल्या. दुसरीकडे, त्याने एक षटक निर्धाव टाकलं. तसेच कमबॅकही केलं. पहिल्यांदा बेन डकेटची विकेट घेतली. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि शेवटी लियाम लिव्हिंगस्टोनला तंबूत पाठवलं.
4 / 5
नागपूर वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने फक्त 248 धावा केल्या. हर्षित राणा व्यतिरिक्त, रवींद्र जडेजाने फक्त 26 धावा देऊन 3 बळी घेतले. दरम्यान, इंग्लंडकडून बटलरने 52 धावा आणि बेथेलने 51 धावा केल्या.
5 / 5