मानोरा (Manora Police raids) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील गिरोली बिट मध्ये ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात पोलीस ताफा पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ग्राम कोलार येथील सविता जगनाथ डापसे ( वय ५० ) वर्ष हिचे राहते घराची झडती घेतली असता पोलिसांनी मुद्देमाल सह २६५०० रुपयाचा माल व गावठी दारू आरोपी चे राहते घरातून पकडली.
पोलीस सुत्राकडून प्राप्त माहितीनुसार, आरोपी सविता डापसे यांच्या घरातून ३० – ३० लीटर सडवा मोहामाचने भरलेले दोन छोटे ड्रम, १५ – १५ चे पाच बकेट, १५-१५ चे चार टिन पत्राचे पिपे असा एकुण १९५ लीटर सडवा मोहामाच कि १९५०० रूपये व एक २० लीटर गा हा भ दारु ने भरलेले कॅन कि २००० रूपये दारु गाळण्याचे ईतर साहित्य ५००० रूपये असा एकुण २६५०० रुपयाचा प्रो माल अवैद्यरित्या मिळुन आल्याने आरोपी वर कलम ६५ ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई (Manora Police raids) पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अभिजीत बारे, डि बी पथक पोहवा मदन पुणेवार, सफौ रविन्द्र राजगुरे, पोशी रोहण तायडे यांनी केली.