प्रयागराज येथील महा कुंभा दरम्यान अनेक भाविकांनी पवित्र संगम मध्ये श्रद्धेने स्नान केले. तर देशभरातील आखाड्यातील नागा साधू आणि संतही स्नानासाठी आले होते. शाही स्नान करण्यासाठी आणि देशभरातील ऋषीमुनींचे दर्शन घेण्यासाठी तसेच त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी लोक महा कुंभात आले होते. परंतु आता सर्व नागा साधू आपल्या आखाड्यांसह परत जात आहे. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की महा कुंभाचा उत्सव महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे तर मग नागा साधू का परत जात आहेत?
महाकुंभाचे शाही स्नान आणि नागा साधू
नागा साधू आपल्या जीवनातील सर्व सुख सुविधा सोडून पूर्णपणे ध्यानात मग्न असतात. सहसा ते आश्रम, पर्वत आणि जंगलामध्ये तपश्चर्या करतात. परंतु जेव्हा जेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा हे सर्व नागा साधू आणि संत तिथे येतात आणि शाही स्नान करण्याचे पुण्य प्राप्त करतात. यावेळी प्रयागराज मध्ये आयोजित महा कुंभाचे पहिले शाही स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला करण्यात आले तर दुसरे शाही स्नान मौनी अमावस्येला आणि तिसरे शाही स्नान वसंत पंचमीला झाले.
परत जात आहेत नागा साधू
नागा साधूंसाठी शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे. शाही स्नान केल्याने 1000 अश्वमेध यज्ञ एवढे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. महा कुंभामध्ये शाही स्नान केल्यानंतर नागा साधू ध्यान करतात आणि धार्मिक ज्ञानावर चर्चा करतात. त्यामुळे वसंत पंचमीचे दिवशी तिसरे आणि शेवटचे शाही स्नान करून सर्व नागा साधू आपापल्या आखाड्यांसह महा कुंभातून परत जात आहेत.
हे सुद्धा वाचा
पुन्हा कधी दिसणार नागा साधू?
नागा साधू महा कुंभाच्या वेळीच एकत्र येतात आता ते पुढील महा कुंभ म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्यात दिसणार आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर महा कुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिथे हजारो नागा साधू एकत्र येतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)